कोपरगाव नगरपरिषदेचे सफाई कामगार कै. राजेंद्र साबळे यांच्या घरी जाऊन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपला वाढदिवस साजरा केला….

अहमदनगर

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. विजय वहाडणे यांनी आज स्वतःचा वाढदिवस कोपरगाव नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी कै.राजेंद्र साबळे यांच्या पत्नी श्रीमती अलका राजेंद्र साबळे यांच्या सफाई कर्मचारी वसाहत येथील घरी जाऊन साडी चोळी देऊन साजरा केला व साबळे परिवारासह भोजनही केले.

केवळ स्वतःच्या कुटुंबासह वाढदिवस साजरा न करता दिवंगत सफाई कर्मचाऱ्याच्या परिवारात जाऊन साजरा करणे यात आत्मिक समाधान आहे असे विजय वहाडणे यांचे म्हणणे आहे. सामाजिक समरसता केवळ भाषणे करून होणार नसून आपण त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
विजय वहाडणे
नगराध्‍यक्ष,
कोपरगांव नगरपरिषद, कोपरगाव .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *