
कोपरगाव प्रतिनिधी:-
“आपल्या कोपरगाव तालुक्यातील उत्कृष्ट क्रीडापटू *फयाज पापाभाई तांबोळी रा टाकळी
यांचा नॅशनल अँथेलॅटिक्स युथ गेम ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत गोल्ड मेडल मिळाल्या बद्दल कोपरगाव तालुका पंचायत समिती मा. सभापती सुनील अंबादास पा देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“पुढील नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व फयाज करणार आहे.त्यात आपल्या देशाची मान अभिमानाने नक्की उंचवाल ही खात्री आहे तसेच महाराष्ट्राचे नाव नगर जिल्ह्याचे नाव आणि कोपरगाव तालुक्याचे तालुक्यावर आपल्या टाकळी गावाचा देखील नाव देशाच्या मानाचा तुरा म्हणून घेऊन फयाज निश्चितच यश मिळवेल अशी इच्छा साई बाबाच्या आशीर्वादाने मी निश्चित होईल मा सभापती यांनी व्यक्त केल्या आणि फयाज यास उज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सुरेश भुसे पा आणि परशराम आभा देवकर उपस्थित होते..!!
