
कोपरगाव प्रतिनिधी:- राजयोगिनी ब्रह्माकुमारी सरला दीदी यांच्या अध्यात्मिक कार्याची तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची आणि व्यसनमुक्ती मध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन जळगाव येथे सेवक सेवाभावीसंस्था ,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ आणि अस्तित्व सोशल फाउंडेशन तर्फे हिरकणी पुरस्कार हा सन्मानाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सरला दीदी यांना गौरविण्यात आले त्यांच्या या कार्यात त्यांना प्रेरणा व आणखी बळ मिळो याकरिता पत्रकार मनोज वाघमारे यांचेसह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती

या कार्यक्रमात श्री संजय देशमुख ,श्री विशाल शर्मा, सौ माधुरी कुलकर्णी ,सौ वर्षा शितोळे आदींसह अनेक भाविक मान्यवर उपस्थित होते
