सूरेगाव सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के वसुली:-विलास वाबळे…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील सुरेगांव विविध कार्यकारी सोसायटीने ३० जुन पुर्वीच जिल्हा सहकारी बँक पातळीवर सभासद शेतक-याकडील कर्जाची सर्व शंभर टक्के वसुली केली असुन संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी प्रगतीपथावर कार्यरत असल्याची माहिती सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विलास वाबळे व मोहनराव वाबळे यांनी दिली.
ते म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली आमदार काळेंच्या बालेकिल्ल्यातील सुरेगांव सोसायटीची सत्ता पुर्ण बहुमताने काबीज करून सभासद शेतक-यांचा विश्वास संपादन केला. सुरेगांव सोसायटीने जिल्हा सहकारी बँक अंतर्गत असणा-या सर्व योजनांची अंमलबजावणी करून त्यांच्याकडील थकीत कर्ज वसुलीसाठी सर्वश्री. छबुराव माळी, सचिन वाबळे, दिपक हुडे, शांताराम मेहेरखांब, सोपान सोनवणे यांच्यासह नवनिर्वाचित संचालक गणेश वाबळे, सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, प्रशांत वाबळे, राजेंद्र वाबळे, गोरख कदम, सोपानराव कदम, शंकरराव कदम, कुमार मेहेरखांब, कुसुमबाई वाबळे, रंजना कदम, राजेंद्र हळनोर यांच्यासह सचिव शांताराम सुकदेव कदम व राजेंद्र भंडारे यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले. संस्थेची शंभर टक्के वसुली झाल्याबददल जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी सर्व घटकांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *