
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड येथील शिलेदारवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे भरत बबनराव शिलेदार व व्हा. चेअरमनपदी प्रितम बाबासाहेब मेहेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मागील महिन्यात शिलेदारवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत सर्वच्या सर्व १३ जागांपैकी ११ जागा काळे गटाच्या निवडून आल्या असून दोन जागा रिक्त आहेत. निवडून आलेले सदस्य पुढीलप्रमाणे भरत शिलेदार, प्रितम मेहेत्रे, भिकाजी डुबे, जयंत शिलेदार, बाबासाहेब देशमुख, सौ. वैशाली शिलेदार, सौ. सुरेखा शिलेदार, सौ. चंद्रकला शिलेदार, सुनील शिलेदार, बबन चव्हाण, वसंत शिलेदार हे काळे गटाचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमनची पदाची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी आर.एन गांगुर्डे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. या निवडणुकीत चेअरमनपदासाठी भरत बबनराव शिलेदार यांच्या नावाची सूचना वसंत बबनराव शिलेदार यांनी मांडली त्यास प्रीतम मेहेत्रे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी प्रितम बाबासाहेब मेहेत्रे यांच्या नावाची सूचना सुनील नारायण शिलेदार यांनी मांडली त्यास बबन चव्हाण यांनी अनुमोदन दिले. चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी आर.एन गांगुर्डे यांनी चेअरमनपदी भरत बबनराव शिलेदार व व्हा. चेअरमनपदी प्रितम बाबासाहेब मेहेत्रे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी भिकाजी डुबे, जयंत शिलेदार, बाबासाहेब देशमुख, सौ. वैशाली शिलेदार, सौ. सुरेखा शिलेदार, सौ. चंद्रकला शिलेदार सुनील शिलेदार, बबन चव्हाण, वसंत शिलेदार हे उपस्थित होते. सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. निवडणूक कामी सचिव हेमचंद्र मोकळ यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
