जेउरपाटोदा सहकारी सोसायटी कोल्हे गटाच्या ताब्यात…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यात राजकीदृष्टया महत्वाच्या असलेल्या जेउरपाटोदा सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध होवुन त्यात कोल्हे गटाचे ११ तर काळे गटाच्या २ संचालकांचा समावेश आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक श्री. नामदेव ठोंबळ व राजकमल गांगुर्डे यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडलेल्या संचालकांचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
बिनविरोध निवडलेल्या संचालकामध्ये कोल्हे गटाचे सर्वश्री. पोपट दामोधर आव्हाड, सोपान विश्वनाथ केकाण, दादासाहेब बाबूराव केकाण, बाळासाहेब देवराम केकाण, सतिष सुभाषराव आव्हाड, राजेंद्र कारभारी केकाण, सुरेश बाबुराव गायकवाड, जिजाबाई किसन गीते, पदमा विठठल आव्हाड, ज्ञानदेव दत्तात्रय बोरावके, ज्ञानेश्वर काशिनाथ केकाण या अकरा संचालकांचा समावेश आहे, तर काळे गटाच्या रामदास भिकाजी केकाण व मोतिराम सावळेराम भाबड या दोघांचा समावेश आहे. माजी सभापती मच्छिंद्र केकाण याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी जेउरपाटोदा सहकारी सोसायटीस सातत्याने सहकार्य करत शेतक-यांच्या उन्नतीसाठी सर्वप्रकारच्या योजना राबविण्यास प्राधान्य दिले, संस्थेची निवडणुक बिनविरोध होण्यासाठी सभासदांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. सदरची निवडणुक बिनविरोध होण्यासाठी सर्वश्री मोहनदादा केकाण, कैलास सानप, रमेश केकाण, सुनिल केकाण, सतिष केकाण, चंद्रकांत सानप, नितीन सांगळे आदिंनी विशेष प्रयत्न केले. सचिव संजय आभाळे यांनी निवडणुकीसाठी सहायक म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *