अ.नगर जिल्हा युवक काँग्रेसची २०२१ या वर्षातील पाहिली आढावा बैठक युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न:- तुषार पोटे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
काल रविवार दि.१० जानेवारी २०२१ रोजी अ.नगर जिल्हा युवक काँग्रेसची २०२१ या वर्षातील पाहिली आढावा बैठक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली,जिल्हा युवक काँग्रेसचे निरीक्षक अकीलभाई पटेल यांच्या निरीक्षणाखाली तसेच


जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञानदेव वाफारे,अध्यक्ष स्मितल वाबळे,जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे,कार्याध्यक्ष राहुल उगले,नगर शहराध्यक्ष मयुर पाटोळे,जिल्हा सरचिटणीस शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व युवक तालुकाध्यक्ष,शहराध्यक्ष व युवा सहकारी मित्र उपस्थित होते.या बैठकीत युवक काँग्रेसच्या चलो पंचायत, चलो वॉर्ड ,युवा जोडो अभियान ,गाव तेथे शाखा व आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपर 1000 या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत चर्चा झाली व काही नवीन पदाधिकारी यांच्याही निवडी करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *