सूर्यतेज संस्थेच्या दीपावली पाड्व्या निमित्त घर तेथे रांगोळी स्पर्धेने कोपरगावकराना नयनरम्य रांगोळ्यांचे प्रदर्शन…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत
अ.भा.मराठी नाट्य परिषद अहमदनगर जिल्हा शाखा,बाल रंगभूमी परिषद, कोपरगाव तालुका
फोटोग्राफर असोसीएशन,कलाध्यापक संघटना, यांचे सहकार्याने सालाबाद प्रमाणे याही वर्षी
कुठलेही प्रवेश शुल्क न आकारता घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सहभागी
स्पर्धकाच्या घरासमोरील अंगणात शुक्रवार दि.५ नोव्हेंबर २०२१ रोजी
सूर्योदयापासून ते सकाळी ९.३० पर्यंत करण्यात आले होते.यात दर्जेदार व
नयनरम्य रांगोळी साकारून सलग नवव्या वर्षी कोपरगावकरानी उस्फुर्त
प्रतिसाद दिला.
शुभकार्याची सुरुवात करताना प्रथम घरापुढे रांगोळी काढण्याची भारत वर्षात
मोठी परंपरा आहे. ६४ कला प्रकारामध्ये रांगोळी कलेला महत्व आहे. सूर्यतेज
संस्थेचा कोपरगाव फेस्टिवल अंतर्गत घर तेथे रांगोळी हा उत्सव सर्व
समावेशक करण्यासाठी बंदिस्त हॉल, रांगोळीचा ठराविक आकार, रंग संगती याचे
बंधन न ठेवता या स्पर्धेसाठी पारंपारिक,निसर्गचित्र,व्यक्तीचित्र,सामाजिक
विषय,व्यंगचित्र असे पाच विषय ठेवण्यात आले होते.या स्पर्धेत
विविध प्रकारात कलाकारांनी रांगोळ्या साकारल्या. प्रत्येक स्पर्धकास
सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी स्पर्धकाच्या प्रत्येक ठिकाणी
कलेचे पदवीधर परीक्षण सहाय्यक, छायाचित्रकार,नोंदणी अधिकारी,संस्थेचे
प्रतिनिधी, निरीक्षक,गाईड अशी ऑनलाइन १५ पथके तयार करून त्याचा प्राथमिक अहवाल
तयार करून व छायाचित्र हे सर्व परीक्षण संदर्भात अंतिम निर्णयासाठी कलेचे
उच्च पदवीधर समिती कडे सुपूर्द करून त्याचा अंतिम निकाल प्रसार
माध्यमाद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षण समिती प्रमुख
सौ.कल्पना हेमंत गीते यांनी दिली.प्रत्येक विषयातून प्रथम विजेत्यास
कापसे पैठणी, राष्ट्रीय आयुर्वेद गुरु रामदासजी आव्हाड यांचे कडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच यशश्री बॅंगल्स विशेष गुणवत्ता रांगोळीस
भेटवस्तू,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,यांचे वतीने देण्यात येणार आहे.तसेच प्रसिद्ध व्यापारी नारायणशेठ अग्रवाल, सुनीलशेठ बोरा यांचेही सहकार्य मिळत आहे.
स्पर्धेनिमित्त कोपरगावातील छोटया- छोटया रांगोळी विक्रेत्यांची मोठी
विक्री झाली. नियोजन आणि व्यवस्थापनशास्त्र मध्ये ही रांगोळी स्पर्धा
महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट समजली जाते.कोपरगावातील रांगोळी कलेत छोटया
छोटया कलाकारांमध्ये दडलेले
पैलू या निमित्त पहावयास मिळाले.ठिपके, संस्कार भारती,प्रबोधन,विविध
निसर्ग व मानव निर्मित वस्तूंचा वापर करून तयार केलेली रांगोळी आणि
कृष्णधवल रंगसंगती पासून सप्त रंगांची मुक्त उधळण केलेली रांगोळी मूळे
रांगोली स्पर्धा वैशिठ्य पूर्ण ठरली.स्पर्धेचा शुभारंभ सूर्यतेजच्या प्रा.मसुदा दारूवाला यांनी भारताला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणारे निरज चोपडा यांची व्यक्ती रेखा विशेष
प्रदर्शनार्थी साकारुन त्यांचा कार्यगौरव केला आहे.या स्पर्धेत
प्रवेश विनामूल्य असल्याने गरीब सर्व सामन्यांच्या दारापासून ते
बंगल्याच्या गच्ची पर्यंत सर्व स्तरावरचा सहभाग हा स्पर्धेचा मानबिंदू
ठरला. या स्पर्धेत मुली-महिलासह तरुण पुरुषांनीही लक्षणीय सहभाग घेतला.
दिवसेंदिवस लोप पावत चाललेले सण-उत्सव-परंपरा उर्जित ठेवण्यासाठी सूर्यतेज संस्थेनेे घर तेथे रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून केलेल्या उपक्रमाचे
सर्वत्र कौतुक होत आहे.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, प्रा.सौ.लताताई भामरे, प्रा.रश्मीताई जोशी,प्रा.सौ.कल्पनाताई गीते,अॅड.सौ.सिमाताई जोशी,प्रा.मसुदा दारुवाला, डॉ.नीलिमाताई आव्हाड,प्रा.प्राजक्ता राजेभोसले,प्रा.दर्शना हलवाई,प्रा.वंदना अलई,सौ.पल्लवीताई भगत,सौ.तेजल सोनवणे,सौ.ऐश्वर्या वाघमारे,प्रा.बी.एस.वाघ,प्रा.अनिल अमृतकर,प्रा.अतुल कोताडे,,प्रा.मतीन दारुवाला,प्रा.अमोल निर्मळ,अनंत गोडसे,प्रा.माधवी पेटकर,रविंद्र भगत,अॅड.महेश भिडे,श्रावणी वाघमारे,सौ.ज्योतीताई कोताडे, सौ.सुरेखाताई आव्हाड,सौ.सीमाताई भिडे,सौ.मनीषा धनवटे,सौ.कोमलताई गोडसे ,सौ.जयश्री मोराणकर,प्रा.सौ.मानसी टिळेकर,प्रा.सौ.पायल देवळालिकर,दिपक शिंदे, अविनाश निकम,चंद्रकांत चोपडे,दीपक येवले,महेश थोरात, मिलिंद जोशी,गणेश कोळपकर कल्पेश टोरपे,अमोल पवार यासह सूर्यतेज संस्थेचे सदस्य कलाध्यापक संघटना,
नाट्य परिषद ,कलाप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *