
कोपरगाव प्रतिनिधी:-
स्व. संतोष श्रीराम डागा यांच्या स्मरणार्थ बँक रोड कोपरगाव येथे डागा कुटुंबियांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना पुण्यस्मरणदिनी इतर खर्च न करता रक्तदानासारखा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी डागा कुटुंबियांचे कौतुक केले.


यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, गटनेते नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, हृषीकेश खैरनार, आकाश डागा व डागा कुटुंबीय उपस्थित होते.
