
कोपरगाव प्रतिनिधी:- शालेय शिक्षणात अत्यंत महत्वाची व विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी ठरणाऱ्या एन एम एम एम या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेला अधिक महत्व आहे. या पक्षेत उत्तीर्ण होण्या बरोबर शिष्यवृत्तीसाठी पाञ ठरण्यासाठी विद्यार्थ्यांना खुप मेहनत घ्यावी लागते. अतिषय अवघड असलेल्या या परीक्षेत कोपरगाव येथील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या तब्बल १० विद्यार्थ्यींनी बाजी मारून शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस.एप्रिल २०२१ परीक्षा निकाल जाहीर झाला असुन त्यात मेहता विद्यालयाच्या १० मुलींनी घवघवीत यश मिळविले असून विद्यालयाच्या या दहा विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र झाल्या आहेत.त्या पाञ विद्यार्थीनीमध्ये कु. विद्या शंकर दुपारगुडे,कु.स्वामिनी विजय आवारे,कु.प्राची चंद्रकांत शिंदे,कु.साची जगदीश कापसे,कु.मयुरी संतोष पगार,कु.पूर्वा सुनिल दवंगे, कु.तनिष्का प्रमोद पवार, कु.अनुष्का मनोज पवार, कु.प्राची विकास शर्मा व कु.भाग्यश्री प्रितम मोहिते. यांचा सामावेश आहे.
वरील सर्व विद्यार्थिनीना शासनाच्या वतीने प्रतिवर्षी रुपये १२हजार रूपये प्रमाणे इ.९वी ते १२वी पर्यंत एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थिनीना मुख्याध्यापिका मंजूषा सुरवसे यांच्या संकल्पनेतून विषेश मार्गदर्शन लाभले तसेच
सर्व विषयाचे शिक्षक, एन.एम.एम.एस विभाग प्रमुख श्रीमती.रेखा पवार,स्पर्धा परीक्षा प्रमुख दीपक भोये, पर्यवेक्षक अरुण गोऱ्हे, भास्कर काजळे , उपमुख्याध्यापक अशोक पठारे, यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
वरील पात्र झालेल्या सर्व विद्यार्थिनीचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजुषा सुरवसे, उपमुख्याध्यापक अशोक पठारे, पर्यवेक्षक अरुण गोऱ्हे, भास्कर काजळे, सर्व सेवक वृंद तसेच स्थानिक स्कूल कमिटी,स्थानिक सल्लागार समिती,शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ , पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
……चौकट…
कोणताही खाजगी क्लास न लावता तसेच करोनाच्या महा संकटाचा सामना करीत घरीच राहुन शिक्षकांच्या मदतीने एन एम एम एस या परीक्षेत यशसंपादन करून दहा विद्यार्थींनी नवा उच्चांक निर्माण केल्याने या गुणवंत विद्यार्थींने सर्वञ कौतूक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
