शिवसेना राहाता तालुका यांचे वतीने ५,००,०००/-रु. (पाच लाख रूपय) किमतीचे वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी (राहाता):-आज शिवसेना राहाता तालुका यांचे वतीने ५,००,०००/-रु. (पाच लाख रूपय) किमतीचे वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये आँक्सिजन मशीन, वाफेचे मशीन, हँन्डगाँल्ज,आँक्सिजन मास्क व ईतर साहित्य होते. यामध्ये श्री साईबाबा सुपर स्पेशालिस्ट हाँस्पीटला हँन्डग्लोज व वाफेचे मशीन देण्यात आले द्वाराकामाई आश्रम यांना दहा वाफेचे मशीन देण्यात आले. ऑक्सिजन मशीन स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजू […]

Read More

काळे गटाचे थोरात यांचे सरपंचपद अबाधित, विरोधकांची खेळी व्यर्थ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीचे सरपंच बाबुराव थोरात यांच्यावर विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव सरपंच बाबुराव थोरात यांनी पाच विरुद्ध तीन मतांनी जिंकत आपले सरपंचपद अबाधित ठेवले असून विरोधकांची खेळी मात्र व्यर्थ गेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या ३ वर्षापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काळे गटाचे बाबुराव […]

Read More

संजीवनीच्या संकेतची कॅनडा विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतिय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील संकेत सुरेश इंगळे याची कॅनडा सरकारच्या मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप्स या संस्थेमार्फत कॅनडामधिल ओंटॅरिओ प्रांतातील युनिव्हर्सिटी ऑफ विंडसोर मध्ये ३ महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी (अंतर्वासिता) निवड झाली आहे. या कालावधीमध्ये त्याला रू ५ लाखांचे स्टायपेंडही मिळणार आहे. महाराष्ट्रातून निवड झालेल्या ४ विद्यार्थ्यांपैकी संकेत हा एकमेव ग्रामीण भागातील अभियांत्रिकी […]

Read More

स्टायलिश मास्क आरोग्यास व कोरोना वाढीस घातक:- तुषार पोटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्टाईलीश व मॅचिंग कॉटन मास्कचे आकर्षण हे देखील कोरोना वाढीचे एक कारण असल्याने अश्या प्रकारचे निरुपयोगी मास्कचे उत्पादन व विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अश्या स्वरूपाची मागणी युवा नेते,जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे यांनी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब व राज्य प्रशासनाकडे कोपरगाव कोरोना आढाव बैठकी दरम्यान केली यावेळी कोपरगाव तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी […]

Read More

घशातील श्राव तपासणीचे रिपोर्ट तात्काळ मिळणेसाठी योग्य ती उपाययोजना करावी:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनीधी:-घशातील श्राव तपासणीचे रिपोर्ट तात्काळ मिळणेसाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी विनंती आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी यांना ई मेल द्वारे केली आहे.ई मेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात ढुस यांनी म्हंटले आहे की,जिल्हा शल्य चिकित्सक अहमदनगर यांचे अंतर्गत जिल्ह्यातील तालूका स्तरावर सुरू असलेल्या कोविड१९ रुग्ण तपासणी साठी जे घशातील श्राव अहमदनगर येथे […]

Read More

महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्यामुळेच समाजात समता : श्री.मुकुंद मामा काळे…..

कोपरगाव प्रतिनीधी:-विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली |नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |वित्ताविना शुद्र खचले |इतके अनर्थ एका अविद्येने केले!!~ महात्मा श्री जोतीराव फुले..।अशिक्षित दुर्बल वर्गांना सबळ करण्यासाठी, त्यांच्या सामाजिक उन्नयनासाठी त्यांना शिक्षणाची वाट उघडी करून देणे, हेच ज्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मानले ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर समाज सेवक, यांना […]

Read More

कोपरगावमध्ये कोरोना आढावा बैठक संपन्न..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ आणि सुविधांची निर्माण होणारी कमतरता यात सामान्य नागरिक भरडला जातो आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथे दिनांक ११-०४-२०२१ रोजीमहसुलमंत्री नामदार श्री.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकिस भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे उपस्थित होत्या..!!सदर […]

Read More

कोपरगाव कोरोना अपडेट्स दि.११ एप्रिल रोजी ११५ कोरोना पॉझिटिव्ह तर अॅक्टिव पेशंट ९९४ तसेच डिस्चार्ज दिलेले ६७ आहेत…

तालुक्यात आजपर्यंत स्वँब टेस्ट १८६०० झाल्या असुन ६०९६ कोरोना पॉझिटिव्ह चा आकडा झाला. डिस्चार्ज दिलेले ५०२० आहे तर उपचार सुरू असलेले ९९४ आहे व मयत झालेले ६८ आहे. कोपरगाव प्रतिनिधी:-आज दि.११ एप्रिल २०२१ आज ६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकूण तब्बल ३६५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ६१ रुग्ण बाधित आढळले .नगर येथे पाठविलेल्या स्वँब […]

Read More

कोपरगाव शहरावर लक्ष केंद्रित करून जास्तीत तपासण्या करा:- ना. बाळासाहेब थोरात…

ऑक्सिजन व रेमडीसीव्हर इंजक्शनचा पुरवठा सुरळीत करून आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून मिळावी:-आमदार आशुतोष काळे… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- मागील वर्षी आलेल्या कोरोना संकटापेक्षा यावर्षी आलेली कोरोनाची दुसरी लाट अतिशय गंभीर आहे. त्यामुळे जास्त खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग व प्रशासनाने एकत्र येवून हि लढाई लढावयाची असून आरोग्य विभाग व प्रशासनाने येणाऱ्या अडचणी लोकप्रतिनिधींच्या […]

Read More

खाजगी डेडिकेटेड कोविड सेंटरने येणाऱ्या सर्व रुग्णांवर उपचार करावे ,तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी बांधील:- आमदार आशुतोष काळे….

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची वाढलेली संख्या व काही बाधित रुग्णांचा कोरोनामुळे झालेले मृत्यू अत्यंत वेदनादायक आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सर्व खाजगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये आलेल्या रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावे. तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मी बांधील असून आपण कृपा करून बाधित रुग्णांना […]

Read More