शिवसेना राहाता तालुका यांचे वतीने ५,००,०००/-रु. (पाच लाख रूपय) किमतीचे वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (राहाता):-
आज शिवसेना राहाता तालुका यांचे वतीने ५,००,०००/-रु. (पाच लाख रूपय) किमतीचे वैद्यकीय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये आँक्सिजन मशीन, वाफेचे मशीन, हँन्डगाँल्ज,आँक्सिजन मास्क व ईतर साहित्य होते. यामध्ये श्री साईबाबा सुपर स्पेशालिस्ट हाँस्पीटला हँन्डग्लोज व वाफेचे मशीन देण्यात आले द्वाराकामाई आश्रम यांना दहा वाफेचे मशीन देण्यात आले. ऑक्सिजन मशीन स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने गरजू रुग्णानांनाअल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे व त्यामधून मिळालेली संपूर्ण रक्कम श्री साईबाबा कोवीड सेंटर साठी खर्च केली जाणार आहे.
हे साहित्य घेणे साठी सरला बेटाचे मंहत रामगिरी महाराज , खा. सदाशिव लोखंडे साहेब, शिवसेना पदाधिकारी, हाँटेल मालक, साईभक्त यांनी आर्थिक सहकार्य केले आहे. याप्रसंगी शिरडी वि.का.स.सोसायटीचे मा.चेअरमन दिगंबर नाना गोंदकर, श्री साईबाबा हाँस्पीटलचे अधिक्षक डाँ.प्रितम वडगांवे, डाँ.मगेश गुजराथी, शिवसेना नेते कमलाकर कोते , तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चौघुले, राहुल गोंदकर पा.,महेश महाले, संतोष जाधव, अनिल पवार, नवनाथ विश्वासराव, चंद्रकांत गायकवाड , बाळासाहेब जगताप, विलास कोते पा , सुनील बाराहाते, राजेंद्र कोते पा;विश्वजित बागुल,सतोष कुर्हाडे,आदित्य कोते पा.सह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *