संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे 16 विध्यार्थी जीपीएटी मध्ये पात्र:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या देश पातळीवरील जीपीएटी या एम. फार्मसी प्रवेश पात्रता परीक्षेत संजीवनीचे तब्बल १६ विध्यार्थी पात्र झाले असुन संकेत सिताराम बावके याने आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर देशात ५७ वा, आकाश पंडीतराव जानराव याने ८३ वा तर प्रतिक भास्कर कोल्हाळ याने ९१ वा क्रमांक मिळवुन संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला […]

Read More

मोरवीस ग्रामपंचायतीच्या एका रिक्त जागेची निवडणुक बिनविरोध होवुन त्यात कोल्हे गटाच्या सौ.सुनिता माळी यांची निवड विवेकभैय्या कोल्हे यांनी केले अभिनंदन…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील मोरवीस ग्रामपंचायतीच्या एका रिक्त जागेची निवडणुक बिनविरोध होवुन त्यात कोल्हे गटाच्या सौ. सुनिता एकनाथ माळी यांची निवड झाली आहे. निवडणुक अधिकारी म्हणून श्री. जे. एन. पठाण यांनी काम पाहिले. बिनविरोध निवडुन आलेल्या सौ. सुनिता माळी यांचे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.याबाबतची माहिती अशी की, मोरवीस ग्रामपंचायतीच्या अनुसुचित जमातीच्या […]

Read More

कोल्हेंच्या सामाजिक कार्याचा वारसा तिस-या पिढीत:- कैलास ठोळे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी देशाच्या व राज्याच्या उत्कर्षात मोलाचे योगदान देत साखर उद्योगातुन परिसराचा कायापालट केला, तोच सामाजिक कार्याचा वारसा तिस-या पिढीत आला असून जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे तो समर्थपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन राज्य पेस्टीसाईडस असोसिएशनचे माजी अध्यक्ष व कोपरगांव पिपल्स बँकेचे […]

Read More

महाराष्ट्र राज्याने इंधनाचे दर कमी करावे:- विक्रम पाचोरे…

कोपरगांव प्रतिनिधी:-केंद्र शासनाने महागाई आटोक्यात आणण्यांसाठी पेट्रोल डिझेल इंधनावरील दर व गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहे मात्र राज्य शासनाने हे दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावी अशा आशयाचे निवेदन कोपरगांव तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे व शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी तहसिलदार विजय बोरूडे यांना बुधवारी दिले.त्यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे […]

Read More

वारी सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे नवनाथ जाधव, व्हा. चेअरमनपदी वाल्मिक जाधव…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या वारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे नवनाथ जाधव व व्हा. चेअरमनपदी वाल्मिक जाधव यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.वारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच मागील महिन्यात पार पडली असून या निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त […]

Read More

मनसे दिव्यांग सेना आयोजित श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना रेल्वे पास काढण्यासाठी भव्य शिबीर संपन्न:- योगेश गंगवाल…

कोपरगाव प्रतिनिधी:-मनसे दिव्यांग सेना आयोजित श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना रेल्वे पास काढण्यासाठी भव्य शिबीर संपन्न मंगळवार दिनांक २४/०५/२०२२ रोजी मनसे दिव्यांग सेना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष योगेश गंगवाल यांच्या आयोजनात मनसे नेते सन्माननीय श्री अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना रेल्वे पास काढण्यासाठी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे […]

Read More

मढी बुद्रुक जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना विहीरीचे भूमिपुजन स्थगित करावे…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील मौजे मढी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत रहिवासीयासाठी १ कोटी ५९ लाख रूपये खर्चाची जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाणी पुरवठयाची योजना मंजुर झाली असून त्यासाठी २५ मे २०२२ रोजी विहीर कामाचे भूमिपुजन होत असुन सदर योजनेसाठी पिण्यांच्या पाण्यांचा स्त्रोत हा क्षारयुक्त, मोहचळ पिण्यासाठी अयोग्य असल्याने हे काम स्थगित ठेवावे अशी मागणी मढी बुद्रुक येथील […]

Read More

श्रीक्षेत्र चास ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा…

कोपरगांव प्रतिनिधी:-सालाबादप्रमाणे याहीवर्षी श्रीक्षेत्र चासनळी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हभप बाबूराव महाराज चांदगुडे यांनी दिली.गेल्या दोन वर्षापासुन कोरोना आपत्तीमुळे पायी दिंडी सोहळयावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यावर्षी वारकरी बांधवांचा हा सोहळा पुन्हा सुरू झाला आहे. तरी भाविकांनी या पायी दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ही दिंडी […]

Read More

इतर मागासवर्गीय समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, तहसिल समोर भाजपने लाक्षणिक उपोषण केले त्याबाबतचे निवेदन स्नेहलताताई कोल्हे यांनी तहसीलदार विजय बोरुडेना दिले…

कोपरगांव प्रतिनीधी:-राज्यातील नाकर्त्या महाविकास आघाडी शासनाने इतर मागासवर्गीय समाजाचे राजकीय आरक्षण घालविले त्याच्यासह येथील स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध करून भारतीय जनता पक्ष इतरमागासवर्गीय समाजाला त्यांचे गेलेले आरक्षण परत मिळवुन देईल असा ठाम विश्वास भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशान्वये राज्यभर इतरमागासवर्गीय समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे […]

Read More

प्रहार दिव्यांग संघटनेअंतर्गत दिव्यांगाप्रती उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रविण भुजाडे यांचा हुसैन शेख बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेमार्फत गौरव…

कोपरगाव प्रतिनिधी:-प्रहार दिव्यांग संघटनेअंतर्गत दिव्यांगाप्रती उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रविण भुजाडे यांचा हुसैन शेख बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेमार्फत गौरव ..,प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.नामदार श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांप्रती उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोपरगाव येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष प्रविण सुदामराव भुजाडे यांचा हुसैन शेख बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्थेमार्फतअहमदनगर येथे गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र […]

Read More