कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या वारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे नवनाथ जाधव व व्हा. चेअरमनपदी वाल्मिक जाधव यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
वारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच मागील महिन्यात पार पडली असून या निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने कोल्हे गटाला पराभवाची धूळ चारत १३ पैकी १२ जागा जिंकून सोसायटीची सत्ता मिळविली आहे.या सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. यावेळी चेअरमन पदासाठी नवनाथ छबुराव जाधव यांच्या नावाची सूचना दिलीप गायकवाड यांनी मांडली त्यास अनुमोदन संजय जाधव यांनी दिले.व्हा. चेअरमन पदासाठी वाल्मिक खंडू जाधव यांच्या नावाची सूचना मधुकर टेके यांनी मांडली त्यास गोकुळ पडघलमल यांनी अनुमोदन दिले. चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी चेअरमन पदी नवनाथ जाधव व व्हा. चेअरमनपदी वाल्मिक जाधव यांची निवड जाहीर केली. निवडणूककामी सचिव जालिंदर टेके यांनी सहकार्य केले.
यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मधुकर निवृत्ती टेके, संजय सुभाष जाधव, मच्छिंद्र शंकर टेके, आप्पासाहेब बाजीराव मलिक, चांगदेव शुकलेश्वर शिरसाठ, गोकुळ ताराचंद पलघडमळ, लता सुधाकर टेके, लताबाई मधुकर गोर्डे, रावसाहेब चांगदेव टेके, दीपक कचरू गायकवाड तसेच सुभाष जाधव आदी मान्यवरांसह सोसायटीचे सभासद व वारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटीचे नूतन चेअरमन नवनाथ जाधव व व्हा. चेअरमन वाल्मिक जाधव यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो ओळ:- वारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे नवनाथ जाधव व व्हा. चेअरमनपदी वाल्मिक जाधव यांची निवडी प्रसंगी त्यांचे अभिनंदन करतांना कार्यकर्ते.
