
कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रहार दिव्यांग संघटनेअंतर्गत दिव्यांगाप्रती उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रविण भुजाडे यांचा हुसैन शेख बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेमार्फत गौरव ..,
प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.नामदार श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांप्रती उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोपरगाव येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष प्रविण सुदामराव भुजाडे यांचा हुसैन शेख बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्थेमार्फतअहमदनगर येथे गौरव चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यात पदार्पण केलेल्या,कल्याण येथील संस्थेमार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष रसीद शेख यांचा दिवंगत मुलगा यास समाजसेवेची आवड असल्यामुळे आपल्या मुलाच्या नावे स्थापन केलेल्या हुसैन शेख बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था व कार्यकारी मंडळामार्फत निवडक मान्यवरांचा दरवर्षी सन्मानपत्र व गौरव चिन्हे देऊन गुणगौरव करण्यात येतो.

त्याच अनुषंगाने दि.२२मे२०२२ रोजी अहमदनगर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रसीद शेख, सलमा शेख उपाध्यक्ष,सचिव रुकसाना शेख,खजिनदार शबाना पठाण व विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रविण भुजाडे यांचा सत्कार समारंभ पार पडला.
