राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच मतदार संघाच्या विकासाला बळकटी:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांनी मतदार संघाच्या विकासासाठी सर्वोतोपरी मदत केल्यामुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच मतदार संघाच्या विकासाला बळकटी मिळाली असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्याशी चर्चा करतांना […]

Read More

काकडी, मल्हारवाडी व डांगेवाडीच्या पाण्याच्या टाक्यांचे काम तातडीने हाती घ्या ना. आशुतोष काळेंच्या विमानतळ अधिकाऱ्यांना सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील काकडी, मल्हारवाडी व डांगेवाडी येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी या गावातील पाणी पुरवठ्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम तातडीने हाती घ्यावे अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात ना. […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त प्रभात फेरीचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हर घर तिरंगा अंतर्गत कोपरगांव शहरातील मुख्य मार्गवरुन प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीमध्ये विदयालयांतील स्काउट गाईड पथक,एन.सी.सी.पथक यांच्या समवेत लेझीम पथक,लाठी काठी पथक सहभागी झाले होते.या पथकातील विदयार्थीनी शहराच्या मुख्य ठीकाणी लेझीम,लाठी काठीची प्रात्यक्षिके तसेच देशभक्तीपर समुहनृत्य सादर करुन शहरातील वातावरण देशभक्तीमय करण्याचा […]

Read More

संवत्सर परिसरातील गणेश बंधारा फुटून शेती पिकांचे प्रचंड नुकसान…

कोपरगाव प्रतिनिधी:-संवत्सर परिसराला वरदान ठराणारा गणेश बंधारा पहाटे पाच वाजता फुटून आसपासच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीची कोपरगांव पंचायत समितीचे मा. गटविकास अधिकारी तसेच संबंधित शासकीय यंत्रणेने पाहणी केली. पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला.आज गुरुवार दि. ११ रोजी पहाटे पाच वाजता या बंधाऱ्याला अचानक भगदाड […]

Read More

संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विध्यार्थी परीषदेचा शपथ विधी उत्साहात शालेय जीवनापासुनच लोकशाहीची रूजवण…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यासाठी व शैक्षणिक कार्य पुढे अधिक कार्यक्षम पध्दतीने नेण्यासाठी स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन शालेय जीवनापासुनच लोकशाहीची रूजवण विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची विध्यार्थी परीषद लोकशाही पध्दतीने मतदान घेवुन निवडण्यात आली. निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्यांना […]

Read More

कोपरगाव मतदार संघातील 11 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी राहता येथे संपर्क कार्यालय सुरू; त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे होतील:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मतदार संघातील 11 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी राहता येथे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची कामे होतील असा विश्वास सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला.कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अकरा गावातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी राहता येथे संपर्क कार्यालय सुरू केले […]

Read More

समृद्धी महामार्गावरील भुयारी मार्गाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान; उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार:- स्नेहलताताई कोल्हे…

प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र झोपेतच!कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर दोन-अडीच वर्षांपूर्वी भुयारी मार्ग बांधण्यात आले असून, त्या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. या भुयारी मार्गाचे काम सदोष झाल्यामुळे त्यामध्ये पाणी साचून वाहनधारकांचे हाल होत आहेत. शिवाय आजूबाजूच्या शेतातही हे पाणी घुसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहेे. मात्र, याकडे तालुक्याचे […]

Read More

संवत्सर गणेश बंधारा फुटल्याने संजीवनीच्या यंत्रणेकडुन तात्काळ दुरूस्ती सुरू:- सौ स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- तालुक्यातील संवत्सर परिसरातील नागपुर मुंबई द्रुतगती मार्गावरील रोहोम बारहाते वस्तीजवळील गणेश बंधा-याचा माती भराव अतिवृष्टीमुळे फुटून मोठया प्रमाणांत नुकसान झाले त्याच्या दुरूस्तीचे काम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या यंत्रणेने पोकलॅन व तीन जेसीबीच्या सहायाने तात्काळ हाती घेतले घटनास्थळास भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी गुरूवारी भेट देवुन पाहणी केली.याबाबतची माहिती […]

Read More

भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना शासन जागा देणाथ:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील पात्र परंतु भुमिहीन असलेल्या लाभार्थ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा देण्याबाबतचा निर्णय घेतल्याने त्याचा कोपरगांव शहर व तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी दिली.त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, वंचित पात्र घरकुल लाभार्थ्यांना या योजनेतून छोटया छोट्या […]

Read More

गोविंदा पथकांनो लागा तयारीला,कोपरगावात राष्ट्रवादीच्या वतीने दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू,पदाधिकाऱ्यांच्या निवडी ना.आशुतोष काळेंनी केल्या जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:-गोविंदा पथकांसाठी खुशखबर असून येणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरू केली असून गोविंदा पथकांना दहीहंडीसाठी आवश्यक सुविधा व नागरिकांना दहीहंडी उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना.आशुतोष काळे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या आहेत.मागील दोन वर्ष संपूर्ण […]

Read More