संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विध्यार्थी परीषदेचा शपथ विधी उत्साहात शालेय जीवनापासुनच लोकशाहीची रूजवण…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यासाठी व शैक्षणिक कार्य पुढे अधिक कार्यक्षम पध्दतीने नेण्यासाठी स्कूलच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांचे संकल्पनेतुन शालेय जीवनापासुनच लोकशाहीची रूजवण विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची विध्यार्थी परीषद लोकशाही पध्दतीने मतदान घेवुन निवडण्यात आली. निवड झालेल्या सर्व विध्यार्थ्यांना सन्मानाने बोलवुन त्यांना स्कूलच्या प्राचार्या सौ. मोना बरकातिया यांनी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर ठाकुरसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, स्कूलच्या संचालिका डाॅ. कोल्हे, प्रिन्सिपाल डायरेक्टर सौ. सुधा सुब्रमण्यम, उपप्राचार्य श्री सचिन सावंत उपस्थित होते.
या चुरशीच्या निवडणुकित मुलांमध्ये विध्यार्थी प्रतिनिधी (हेड बाॅय) म्हणून सर्वात जास्त मते मिळविणारा देवांषु प्रषांत होन याची निवड झाली तर हेड गर्ल म्हणुन जिया पारख हिची निवड झाली. शालेय क्रीडा प्रमुख पदी स्वरूप लुटेची निवड झाली. या व्यतिरीक्त विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी चार हाऊसेस तयार करण्यात आली. यात तक्षशिला हाऊसचा कॅप्टन म्हणुन ओम पाटील तर उप कॅप्टन पदी प्रथमेश पांडेची निवड झाली. विक्रमशिला हाऊसच्या कॅप्टन पदी आर्यन औताडे तर उप कॅप्टन पदी स्वरीत बळगातियाची निवड झाली. नालंदा हाऊसच्या कप्टन पदी आदित्य खरात तर उप कॅप्टन पदावर श्रृती गांगुर्डेची निवड झाली. इंद्रप्रस्थ हाऊसच्या कॅप्टन पदाची धुरा सांभाळण्यासाठी साईश शर्माची निवड झाली तर कॅप्टन पदावर श्रेया अय्यरची निवड झाली. क्रीडा शिक्षक श्री विरूपक्ष रेड्डी यांनी निवडणुक अधिकारी म्हणुन काम पाहीले.
शपथ विधी संपल्यांवर शाळेतील विध्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. काही मुलांनी भारत माता भारताच्या माजी राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या भुमिका साकारत एकांकिका सादर केल्या. उपस्थित सर्व मान्यवर तसेच संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांच्या संपुर्ण शेक्षणिक वर्षाच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या .

फोटो ओळी: संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डाॅ. कोल्हे, मेजर ठाकुरसिंग, सौ. सुधा सुब्रमण्यम, सौ. मोना बरकातिया, श्री सचिन सावंत उपस्थित यांच्या समवेत संजीवनी इंटरनॅशनल स्कूलची नवनियुक्त विध्यार्थी संसद सदस्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *