अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे अहवाल तातडीने सादर करा दफनभूमी व स्मशानभूमीचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावा:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- काही दिवसांपासून सातत्याने पावसाची संततधार सुरु असून मागील दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे व नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे अहवाल तातडीने शासनदरबारी पाठवा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी आढावा बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या […]

Read More

आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-सर्व समाजाप्रमाणेच आदिवासी बांधवांना देखील शिक्षण, आरोग्य तेसच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्री. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोपरगाव येथे आदिवासी महादेव कोळी युवक संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी ना. […]

Read More

हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी व्हावे:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपल्या देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत संपूर्ण देशभर हर घर तिरंगा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेते सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने आशा सेविकांच्या सहाय्याने शासकीय दराने सर्व सामान्य […]

Read More

मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार समाजाच्यावतीने कोपरगावमध्ये शुक्रवारी महाप्रसादाचे आयोजन..!!

कोपरगाव प्रतिनिधी:-जगभरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या समग्र साईचरित्राचा पारायण सोहळा सुरू आहे. या सोहळ्याच्या सांगतानिमित्ताने शुक्रवारी (ता.१२) कोपरगाव शहरातील संत नरहरी विठ्ठल मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी दिली.मुंबादेवी तरुण मंडळ, समस्त सुवर्णकार समाज यांच्यावतीने साईचरित्र पारायण सोहळा सुरू आहे. या सोहळ्याची शुक्रवारी (ता.१२) सांगता शहरातील संत नरहरी […]

Read More

९ ऑगस्ट- क्रांतिदिन; ‘जान्हवी व प्रमोद’ यांनी क्रांती दिनाच्या दिवशी घेतला क्रांतिकारी निर्णय,, देवळाली प्रवरा पॅटर्न ची राज्यभर पुनरावृत्ती होतेय याचे समाधान:- आप्पासाहेब ढुस…

कोपरगाव प्रतिनीधी(राहुरी):-९ ऑगस्ट क्रांतिदिनी राहुरीत झालेल्या ‘जान्हवी – प्रमोद’ शुभ विवाहाने राज्यातील तरुणांना एकल (विधवा) विवाहासाठी क्रांतीचा संदेश दिला असून या विवाहाने देवळाली प्रवरा पॅटर्नची पुनरावृत्ती झाली असून याने राज्यातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे असे महाराष्ट्र राज्य कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष तथा.. प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष आप्पासाहेब […]

Read More

कोपरगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने कोपरगाव मध्ये आदिवासी महादेव कोळी युवक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अहमदनगर यांचे वतीने कोपरगाव मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार आशुतोष जी काळे अध्यक्ष श्री साईबाबा विश्वस्त संस्था शिर्डी हे होते यावेळेस माननीय […]

Read More

ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये साचलेले पाणी काढले बाहेर संजीवनी उद्योग समूहाची यंत्रणा धावली आपदग्रस्तांच्या मदतीला…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरात अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा संकटसमयी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी नागरिकांच्या मदतीला धावून जात सामाजिक बांधिलकी जोपासली. आजही विवेकभैय्या कोल्हे यांनी टाकळी नाका निवारा कॉर्नर भागातील ओम निवारा कॉम्प्लेक्समध्ये […]

Read More

सरलाबेटाच्या आळंदी आश्रमास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंच्या स्मरणार्थ ११ लाखाचा देणगी धनादेश महंत रामगिरींना प्रदान…

कोपरगांव प्रतिनिधी:-प. पू. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची गोडी जगभरातील भाविकांना लागली असुन नारायणगिरी महाराजांच्या नंतर महंत रामगिरी महाराज हा वसा समर्थपणे पुढे नेत आहेत. श्रीक्षेत्र कोकमठाण येथे पार पडलेल्या १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहात सराला बेटाच्या आळंदी आश्रमास भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी […]

Read More

ना. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला मोठे यश, घरकुला संदर्भात होणार फेरसर्वे, ५००० पेक्षा जास्त कुटुबांना होणार फायदा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील गरजू पात्र कुटुबांना घरकुलाच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्याबाबत या नागरिकांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. त्याची दखल घेऊन ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून या पात्र कुटुबांना घरकुलाचा लाभ देण्यासंदर्भात फेरसर्वे करण्यात येणार असल्याची माहिती ना.आशुतोष […]

Read More

अतिवृष्टीग्रस्तांना प्रशासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी :- स्नेहलताताई कोल्हे…

स्नेहलताताई कोल्हे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आपद्ग्रस्तांना दिला दिलासा…कोपरगाव प्रतिनिधी:-सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरातील व्यापारी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी तहसीलदार विजय बोरुडे यांची भेट घेऊन केली. कोपरगाव शहरात आणि […]

Read More