नाटेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी काळे गटाचे, अंबादास मोरे व्हा. चेअरमनपदी घमाजी मोरे यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव विविध सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत काळे गटाचे अंबादास धोंडीबा मोरे यांची चेअरमनपदी तर घमाजी सुकदेव मोरे यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.नाटेगाव सोसायटीची सत्ता काळे गटाकडे असून रोटेशन पद्धतीनुसार विद्यमान चेअरमन गणेश मोरे व व्हा. चेअरमन सौ. भारती पिंगळे […]

Read More

पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राज्यसरकार कडून नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):- पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राज्यसरकार कडून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे. आज राज्य सरकारने राज्यातील १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या त्यामध्ये पी. शिव शंकर याना साईबाबा संस्थानचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केल्याचे राज्य […]

Read More

युवा उद्योग संघटने तर्फे,कोपरगाव शहरातून भव्य चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन….

कोपरगाव प्रतिनिधी:-एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा संपूर्ण ऑनलाइन स्वरूपात असणार आहे लहान मुलांच्या तसेच लेखक आणि कलाकारांना वाव देण्यासाठी आणि भारताविषयी प्रेम भावना तसेच त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आयोजकांनी या स्पर्धेसाठी विषय दिले आहे या स्पर्धेसाठी खालील तीन विषय आहेत […]

Read More

मथुराबाई टेके यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:- जुन्या पिढीतील जेष्ठ प्राथमिक शिक्षिका मथुराबाई बाबुराव टेके (वय ९२, रा. वारी ता. कोपरगाव )यांचे सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगी, एक सुन, दोन नातू, एक नात, दोन नात सुना, जावई, नातवंडं, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांनी ३५ वर्ष प्राथमिक शिक्षका म्हणून ज्ञानदानाचे काम केले आहे. कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील […]

Read More

संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अन्सारीची तैवान विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये तृतिय वर्षात शिकत असलेल्या मोहम्मद अनस अन्सारी या विद्यार्थ्याची संजीवनी मध्ये कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने व मार्गदर्शनाने जागतीक क्रमांक ७७ असलेल्या नॅशनल तैवान युनिव्हर्सिटीमध्ये आठ आठवड्यांच्या इंटर्नशिपसाठी (आंतरवासिता) निवड झाली आहे. त्यासाठी अन्सारीला तैवान विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळणार आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित […]

Read More

कोपरगांव बाजार समिती निवडणुक बिपीनदादा कोल्हेंनी मानले मतदारांचे आभार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव विधानसभा मतदार संघातील शेतक-यांच्या आर्थीक उन्नतीचे केंद्र असलेल्या कोपरगांव बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांसह शेतक-यांनी एकमुखाने विश्वास व्यक्त करून सर्व उमेदवारांना मोठया मताधिक्क्याने विजयी केले त्याबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी मतदारांचे जाहिर आभार मानले असुन बाजार समितीच्या माध्यमांतुन शेतकरी विकासाला सर्वांना बरोबर घेवुन सर्वोच्च प्रधान्य देण्याचे जाहिर केले.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात […]

Read More

माहेगाव देशमुख सेवा सोसायटीच्याअध्यक्षपदी मधुकर काळे, उपाध्यक्षपदी यशवंतराव देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर भानुदास काळे व उपाध्यक्षपदी यशवंतराव लक्ष्मणराव देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.माहेगाव देशमुख सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष संजय गोविंदराव काळे व उपाध्यक्ष डॉ. शिवाजी भानुदास रोकडे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष […]

Read More

सर्वसामान्यांना ६०० रूपयांत वाळू ब्रास देण्याचा शासनाचा क्रांतीकारीनिर्णय:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील…

श्रीरामपूर तालुक्यातील नायगांव येथे महाराष्ट्र राज्यातील पहिल्याशासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचेलोकार्पण…कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- ‘‘सर्वसामान्य जनतेला ६०० रूपयातघरपोच वाळू ब्रास मिळणार आहे.‌ राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्याप्रथम अहमदनगर जिल्ह्यातून आजच्या महाराष्ट्र दिनापासून होत आहे.सर्वसामान्यांचे हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे.’’असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यसाय विकास मंत्री‌तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील […]

Read More

गायत्री व अश्विनी घारे यांच्या जिद्दीला व मेहनतीला सलाम:- स्नेहलताताई कोल्हे…

शहापूर येथील गायत्री घारे व अश्विनी घारे यांची पोलिस कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते सत्कार…कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील शहापूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील गायत्री बाबासाहेब घारे आणि अश्विनी बाबासाहेब घारे या भगिनींनी कठोर परिश्रम घेऊन पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुलींमध्येही गुणवत्ता […]

Read More

पंतप्रधानांच्या मन की बात मधुन सामाजिक कार्याचे अदान-प्रदान:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात उपक्रमातून सामाजिक कार्याचे अदान-प्रदान होते. सबका साथ सबका विकास हा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम तळागाळात यशस्वी होतांना दिसत असल्याचे प्रतिपादन प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.‘मन की बात’ या उपक्रमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या माध्यमातून १४० कोटी जनतेशी संवाद साधुन तळा- गाळातील वंचितांचे दुःख जाणून […]

Read More