Uncategorized

आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून प्रवाशांच्या सेवेसाठी कोपरगाव बस आगारात नवीन सात जिजाऊ बस दाखल…

कोपरगाव प्रतिनिधी
कोळपेवाडी वार्ताहर- राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक यांच्याकडे आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यातून यापूर्वीच कोपरगाव आगारात लालपरी १० व जिजाऊ ०५ नवीन बस मिळाल्या आहेत. व पुन्हा एकदा ०७ नवीन जिजाऊ बस दाखल झाल्या असून त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोपरगाव बस आगाराकडे बसेसची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामध्ये विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हि अडचण ओळखून आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव आगारासाठी नवीन बस मिळाव्यात यासाठी वेळोवेळी राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे आजपर्यंत कोपरगाव आगाराला १५ नवीन बस मिळाल्या आहेत
त्यामुळे प्रवाश्यांच्या अडचणी कमी झाल्या होत्या. तरी देखील अधिक बस मिळाव्या यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा पाठपुरावा चालू होता त्या पाठपुराव्यातून कोपरगाव आगाराला पुन्हा एकदा ७ नवीन बस दाखल झाल्या असून त्यामुळे नवीन बसेसची संख्या एकूण २२ झाली आहे. त्यामुळे प्रवाश्यांना होणारा त्रास निच्छितपणे कमी होणार आहे व बस प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होणार आहे त्यामुळे बस प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून प्रवाशांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

नव्याने ०७ बस मिळाल्यामुळे येणाऱ्या दसरा-दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना येणाऱ्या अडचणी निश्चितपणे दूर होवून प्रवास सुखकर होईल. यापुढील काळात अजूनही बस कशा मिळविता येतील यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. त्यामुळे बसने मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्या महिला भगिनी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्या अडचणी कायमच्या दूर होतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *