
कोपरगाव प्रतिनिधी:-
एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सर्वांसाठी खुली आणि विनामूल्य चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा संपूर्ण ऑनलाइन स्वरूपात असणार आहे लहान मुलांच्या तसेच लेखक आणि कलाकारांना वाव देण्यासाठी आणि भारताविषयी प्रेम भावना तसेच त्यांचे मत जाणून घेण्यासाठी आयोजकांनी या स्पर्धेसाठी विषय दिले आहे या स्पर्धेसाठी खालील तीन विषय आहेत यापैकी कुठल्याही एका विषयावर स्पर्धक चित्र अथवा निबंध तयार करून पाठवू शकतो.
मी भारताचा जबाबदार नागरिक झालो तर. .. ,
भारतीय संस्कृती, माझी बदलते आरोग्य. यावर्षी साठी अशी विषय देण्यात आले आहे. स्पर्धकांनी खालील मोबाईल नंबर वर व्हाट्सअप द्वारे 16 मे 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवायचा आहे मो.7058933093 या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक कालांश राजगिरा लाडू आणि रंगकला प्रोडक्शन तसेच इतर अन्य युवा उद्योजक असून संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेचे सहभाग नोंदवला जाणार आहे लहान मुलांनी वयोवृद्धांनी तरुणांनी जास्तीत जास्त या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन युवा उद्योग संघटनेमार्फत केले गेले आहे
