
कोपरगाव प्रतिनिधी:- जुन्या पिढीतील जेष्ठ प्राथमिक शिक्षिका मथुराबाई बाबुराव टेके (वय ९२, रा. वारी ता. कोपरगाव )यांचे सोमवारी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगी, एक सुन, दोन नातू, एक नात, दोन नात सुना, जावई, नातवंडं, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांनी ३५ वर्ष प्राथमिक शिक्षका म्हणून ज्ञानदानाचे काम केले आहे. कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील उषाताई रायभान चिने यांच्या आई तर वारी येथील प्रगतशील शेतकरी उमाकांत टेके, श्रीकांत टेके यांच्या त्या आजी होत.
