
कोपरगाव प्रतिनिधी:- प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ आयोजित ‘जागर स्त्री शक्तीचा – नवरात्रौत्सव २०२१’ कार्यक्रमात दि.११ ऑक्टोबर रोजी वकील व अभियंत्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
तसेच दि.११ ऑक्टोबर रोजी ब्राह्मण समाज महिला मंडळाच्या वतीने देवीसमोर भोंडला (हातगा) सादर करण्यात आला. भोंडला किंवा हातगा हा मराठी लोकगीतांचा प्रकार असून त्यामध्ये नवरात्रीच्या दिवसांत (हस्त नक्षत्र) रांगोळीने हत्तीचे चित्र रेखाटून त्याभोवती फेर धरून नृत्य केले जाते. जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठी लोकसंगीताचा हा प्रकार नवीन पिढीला माहीत होत आहे.
यावेळी कोपरगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. शिरीषजी लोहकणे, अॅड. बाळासाहेबजी कडू, राष्ट्रवादी वकील सेलचे शहराध्यक्ष अॅड. विद्यासागरजी शिंदे, अॅड. एस. के. जाधव, अॅड. सौ. एस. जी. जवाद, बी.के. खालकर, राहेंद्रजी मुंजे, माजी नगराध्यक्ष सौ. ऐश्वर्याताई सातभाई आदी उपस्थित होते.
