सोयाबीन शेतमाल तारण योजना शेतकर्यांसाठी फायदेशीर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कृषि उत्पन्न बाजार समिती कोपरगांव मार्फत शेतमाल तारण योजना १२ महिने राबविण्यात येत असुन शेतक – यांचा शेतमाल वखार महामंडळाचे गोदामात ठेवून चालु बाजार भाव / शासकीय आधारभुत दराच्या ( कमी असेल ते ) ७५ टक्के रक्कम शेतक – याच्या बँक खात्यावर आरटीजीएस / नेफ्ट व्दारे शेतमाल तारण कर्ज म्हणुन जमा करण्यात येते . जेव्हा बाजारात शेतमालाचे दर कमी असतात त्यावेळी शेतक – यांचे कमी दरात शेतमाल विक्री करून आर्थिक नुकसान होवू नये तसेच भविष्यात वाढणा – या भावाचा लाभ शेतक – यांना मिळावा यासाठी शेतमाल तारण योजना ही शेतक – यासांठी फायदेशीर ठरणारी आहे . सदर योजनेत स्वच्छ व चांगल्या प्रतीचा शेतमाल स्वीकारण्यात येतो . शक्यतो १२ टक्के पेक्षा अधिक आद्रता असलेला शेतमाल तारण योजनेत स्वीकारला जात नाही . त्यामुळे शेतक – यांनी शेतमाल स्वच्छ करून व उन्हात वाळवून शेतमाल तारण योजनेत ठेवण्यासाठी आणावा . महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत वखार महामंडळाचे गोदामात शेतमाल ठेवून व वख पावती वर द.सा.द.शे. ६ टक्के व्याज दराने सहा महिन्यासाठी शेतक – यांना शेतमाल तारण योजनेत कर्ज पुरवठा करण्यात येतो . सहा महिन्याचे आत शेतमाल विक्री न केल्यास ८ टक्के व्याजाची आकारणी केली जाते . त्यामुळे शेतक – यांनी सहा महिन्याचे आत भाववाढ होईल तेव्हा शेतमाल विक्री करणे फायदेशिर राहाते . तरी शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल सोयाबीन किंवा इतर शेतमालाची विक्री कमी दरात न करता शेतमाल साठवून ठेवून त्यावर शेतमाल तारण योजने अंतर्गत ६ % व्याज दराने कर्ज घेवून आपली तात्पुरती गरज भागवावी व भाववाढ होईल तेव्हा शेतमाल विक्री करून वाढणा – या भावाचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार प्रशासक श्री . एन.जी.ठोंबळ व सचिव श्री . एन . एस . रणशूर यांनी केले आहे . समितीचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *