ईश्वरीच्‍या मदतीला आल्या शिवसेनेच्या युवती धावुन:- वैद्यकीय उपचारांसाठी केली आर्थिक मदत…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी :- हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे मराठी माणूस अडचणी असेल तर त्याला पहिली मदत करा या शिकवणी प्रमाणे कोपरगाव शहरातील ईश्वरी गंगावणे ह्या छोट्या मुलीला शिव सेनेच्या युवती सेनेच्या वतिने मदत करण्यात आली आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कोपरगाव शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांच्या सहकार्याने शहर युवती सेनेचे कामकाज सुरु असुन नुकतेच मोहनीराजनगर बेट भागातील ईश्वरी गंगावणे हि लहान मुलगी बोरवेलच्या खड्यात पडली होती.प्रशासनाने अथक प्रयत्न करुन या बालिकेस वाचविले आहे.परंतु या मुलीला वाचवितांना तिच्या हाताला जखम झाली आहे.थोडा मारही लागला होता.परिस्थिती हालाखिची असल्याने मदती मागणी सोशल मिडीयावर झळकु लागली.यानंतर त्वरित शहरातील शिव सेनेच्या युवती सेनेच्या युवतींनी पुढे येवून तत्काळ मदत केली.ईश्वरीस वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत त्याच बरोबर खेळणीही देवून हातभार युवती सेनेच्या वतिने देण्यात आला आहे.परमेश्वर ईश्वरी ला लवकरात लवकर बरी करो दुःखात ती एकटी नसून सर्व शिव सेना प्रेमी युवा सेना युवती सेना तिच्या बरोबर आहे.यावेळी अनिता वायखिंडे, ,शितल चव्हाण,अमृता राऊत,पूजा शर्मा,सुकन्या आम्ले,जयश्री वायखिंडे, दिपाली वायखिंडे, शिवसेना कोपरगाव शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल, शिवसेना शहर संघटक वैभव गिते,राहुल वायखिंडे,सागर चव्हाण,दत्तात्रय गिते,नितिन राऊत शहर संघटक,लतीफ खान,वैभव वायखिंडे, पठाण युवा शिक्षक संघ आदि शिवसेना प्रेमी बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *