

कोपरगाव प्रतिनिधी:- “माझा ज्ञानोबा”
कोपरगाव तालुक्यात जन्मलेल्या तरुणांचा एक सत्य संकल्प आर्विक प्रोडक्शन कोळपेवाडी निर्मित …मालिका निर्मात्याची कोपरगावच्या भूमिपुत्रांचा…
राष्ट्रसंत जनार्धन स्वामी आश्रमात महंत.रमेशगिरीजी महाराज यांचे हस्ते व माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे उपस्थित सत्कार करण्यात आला…


“मायबोली” चॅनेलवरील अज्ञात सत्य सांगण्याचे धाडस करणारी मालिका “माझा ज्ञानोबा”
३०सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे.
( गुरूवार, शुक्रवार, शनिवार रात्री ९:०० )

महाराष्ट्राच्या आध्यात्माच्या जगात एक इतिहास घडतोय. होय हा एक इतिहासच आहे. वारकऱ्यांनी केली, करत आहेत “माझा ज्ञानोबा” या मालिकेची निर्मिती आर्विक प्रोडक्शनच्या माध्यमातून होत आहे.
या मालिकेचे
निर्माते- जलाल महाराज सय्यद, प्रशांत पवार कोळपेवाडी
पटकथा संवाद जलाल महाराज सय्यद
सह निर्माता – प्रमोद भळगट, ह.भ.प. शुभम पानगव्हाणे


कार्यकारी निर्माते – सुमित पवार कोपरगाव
सह पटकथा लेखक श्री सुदर्शन खडांगळे कोपरगाव
संगीत संयोजन- शामजी गोराणे, अरूण महाराज पगारे, कोपरगाव
कला दिग्ददर्शक रमेश टिक्कल सर कोपरगाव
पार्श्वगायन- रवी महाराज पवार, ज्योतीताई गौराणे,
सह संकलन सागर पवार कोळपेवाडी
दिग्दर्शन – प्रमोद श्रीवास्तव
हे सर्व वारकरी आहेत, आणि यातील भूमिका करणारे बहुतांश कलाकारही वारकरीच आहेत. म्हणूनच “माझा ज्ञानोबा” ही मालिका एक इतिहासच आहे.
या मालिकेचे खास आकर्षण म्हणजे.
१)ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा गोविंदपंत यांच्यापासून मालिकेची सुरुवात.
२) ज्ञानेश्वर माऊलींच्या जिवणप्रवासात महत्वाची, निर्णायक भूमिका असणारे, संत भोजलिंग काका यांचे चरित्र प्रथमच प्रेक्षकांच्या समोर येत आहे.
पैसा मिळवण्यासाठी नाही, ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रद्धेपोटी. अज्ञात सत्य जगासमोर यावं यासाठी. “माझा ज्ञानोबा” च्या टीमने मोठी जबाबदारी घेतली आहे. टीव्ही, चित्रपटाशी संबंधित असणाऱ्या गर्भश्रीमंत व्यक्तीलाही एकादी मालिका बनवताना प्रचंड अडचणी येतात. “माझा ज्ञानोबा” ची टीम तर वारकरी आहे. चित्रिकरणासाठी लागणारे तंत्रज्ञान, अर्थकरण, विषयाशी संबंधित साम्य असणाऱ्या वास्तू, नैसर्गिक स्थळे यांचे शोधकार्य, काही संदर्भांचे शोधकार्य इत्यादी कार्यामध्ये येणाऱ्या प्रचंड अडचणींवर मात करत, या टीमचा प्रवास आहे.
या “माझा ज्ञानोबा” टीमच्या कष्टाला, तळमळीच्या श्रद्धेला, सत्यमेव जयते वृत्तीला लाख लाख सलाम.
ही “माझा ज्ञानोबा” मालिका आपण पाहू, इतरांनीही पाहवी म्हणून आपण या मालिकेचा प्रसार करू, ही मालिका जास्तीजास्त प्रेक्षकांच्यापर्यंत पोहचायला हवी. तेच “माझा ज्ञानोबा” मधील वारकऱ्यांच्या कष्टांचं फळ असेल. यावेळी महंत.रामेशगिरजी महाराज यांनी या सर्वे कोपरगाव च्या भूमी पुत्रांना आशीर्वाद दिले व माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी या टीम च्या सर्वांना पुढील चांगल्या कामासाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले व सर्वांनी ही मालिका आपल्या गावाच्या गावकऱ्यांनी केली असल्याने ते सर्वांनी शेवट परियन्त हे सिरीयल बघण्याचे आवाहन केले.यावेळी मनोज कानडे , शंतनू गुळसकर उपस्थित होते
