
कोपरगाव प्रतिनिधी:- समृद्धी महामार्गाच्या वाहनाने खराब झालेला कोपरगाव तालुक्यातील खोपडि भउर रस्ता त्वरीत बनवुन द्यावा…
अन्यथा, समृद्धी महामार्गाचे एकही वाहन त्या रस्त्यावर चालू देणार नाही
सतिश आण्णा काकडे
तळेगाव रस्त्यालगत असलेल्या खोपडी ( धोत्रे ) भउर रस्त्यावरुन समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी अहोरात्र अनेक डंपर सुरू आहेत
त्या डंपर वाहतुकीमुळे धोत्रे खोपडी गावाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
त्या रात्री गाडी चालवणे तर सोडा पायी चालणे देखील अवघड झालेले आहे.
नागरिकांना कामानिमित्त बाहेर जाणे देखील अशक्य होत असून गावातील एखादा व्यक्ती आजारी पडल्यास त्याला उपचारासाठी दवाखान्यात या रस्त्याने कसे घेऊन जायचे हाच मोठा प्रश्न गाव कऱ्यानं समोर पडत आहे.
गावकऱ्यांच्या हालअपेष्टा ला व रस्त्याच्या दुरावस्थेला केवळ आणि केवळ समृद्धी महामार्गाच्या चालू असलेला डंपर वाहतूक कामामुळेच ही वेळ आलेली असून कंपनी जबाबदार आहे
सदर रस्त्यावर मुरुम टाकून रस्ता सुरळीत करून न दिल्यास महामार्गाच्या कुठल्या प्रकारची वाहने जाऊन देणार नाही
असे निवेदन
कोपरगाव नायब तहसीलदार कुलकर्णी मॅडम यांना देण्यात आलेले आहे
या वेळी
सतिश आण्णा काकडे
कोपरगाव मनसे शहराध्यक्ष
रघुनाथ मोहिते
मनसे उपतालुकाध्यक्ष
महेश वारकर
उपतालुकाध्यक्ष
बंटी भैय्या
विद्यार्थी जिल्हा संघटक
बापु काकडे
हिंदू सम्राट संघटना संस्थापक
नवनाथ मोहिते,
मनसे युवा नेते,
छोटूभाई पठाण
आदी मनसैनिक उपस्थित होते
