भूमीपुत्र फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या शिक्षकांचा सन्मान..!!

कोपरगाव

कवयित्री दिलशाद सय्यद यांनी लिहलेल्या आणि नुकताच प्रकाशित झालेले रंग उन्हाचे या काव्यसंग्रहाची भेट सामाजिक कार्यकर्ते निसार भाई शेख यांना कोपरगाव येथे देण्यात आली..!कोपरगाव प्रतिनिधी:- आपल्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.शैक्षणिक दीपस्तंभ कोपरगाव राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराचे वितरण आज कोपरगाव येथे पार पडले.

सामाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख यांच्या बहीण अकोले तालुक्यातील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा येथे आदर्श शिक्षिका, कवयित्री ,दिलशाद यासीन सय्यद,यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाला आहे तसेच कोपरगाव शंकर नगर येथील शबाना तांबोळी मॅडम जिल्हापरिषद शाळा पढेगाव यांना ही राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाला आहे ,त्या निमित्ताने आज कोपरगाव येथे भूमीपुत्र फाउंडेशन च्या वतीने आज दोन्ही शिक्षिकेंचा पुष्पहार ,शॉल देऊन गौरव करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी ,भूमीपुत्र फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष निसार भाई शेख, हाजी मन्सूरभाई शेख,प्राध्यापक यासीन सय्यद, ,एडव्होकेट समीर भाई शेख,माजिद पठाण,इम्रान शेख,सुनील बोऱ्हाडे, आसिफ पठाण,अर्षद पठाण,साहिल सय्यद,काजीम शेख,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *