
कोपरगाव प्रतिनिधी:-
‘शिर्डी’ येथे नूतन भावफलकाचे अनावरण करण्यात आले. बऱ्याच दिवसांपासून शिर्डी शहर नाभिक संघटनेचे सदस्यांची दरवाढीची मागणी होती ती मागणी शहराध्यक्ष श्री दिपकभाऊ बिडवे व उपाध्यक्ष मुस्ताकभाई शेख यांनी पूर्णत्वास नेली. सर्व रेट बोर्ड शिर्डी शहरातील प्रसिद्ध उद्योगपती श्री सुनीलभाऊ गायकवाड यांच्या विशेष सहकार्याने प्राप्त झाले. दर फलक अनावरण राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे संपर्कप्रमुख श्री संजयभाऊ जाईबहार ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामनाथजी वर्पे, श्री काकासाहेब वाघमारे, श्री आनंदभाऊ बिडवे, माजी शहराध्यक्ष श्री संजयभाऊ बिडवे अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ, श्री संतोषभाऊ औटी, श्री संजयभाऊ बिडे, श्री अनिलभाऊ कदम, श्री दिपकशेठ पवार, श्री अभिजित जगताप, श्री अण्णाभाऊ कदम, श्री गणेशभाऊ बिडवे आदी समाज बांधव उपस्थित होते.
ॐ साई राम
