कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगर ची ५० वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे मार्गदर्शक माजी आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम बँकेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ झाला. अध्यक्ष पदाची सूचना बिपिनराव गवळी यांनी मांडली. सदर सूचनेस रविंद्र आहेर यांनी अनुमोदन दिले. जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी २०२०-२१या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. यावेळी संचालक ज्ञानेश्वर हाळनोर यांनी कंपनीचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांची शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.
सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी केले तर आभार संचालक विजय जाधव यांनी मानले. यावेळी गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ऊस तोडणीसाठी जात असतांना अपघात होऊन विष्णु मदन राठोड या ऊस तोडणी मजुराचा मृत्यू झाला होता. गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीने ऊस तोडणी मजुरांची विमा पॉलिसी घेतली असल्यामुळे मयत राठोड यांच्या कुटुंबियाला न्यू इंडिया इंश्युरन्स कंपनीकडून मंजूर झालेला ३ लाख रुपयांचा धनादेश माजी आ.अशोकराव काळे यांच्या हस्ते देण्यात आला.
याप्रसंगी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक विश्वासराव आहेर, सचिन चांदगुडे, काकासाहेब जावळे, गौतम बँकेचे मुख्य व्यवस्थापक बापूसाहेब घेमुड, अॅड. एस.डी.औताडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, ऊस विकास अधिकारी कैलास कापसे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; चे कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे, गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर भिकाजी सोनवणे आदी मान्यवरांसह संचालक मंडळ व सभासद कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टन्सिंग ठेवून उपस्थित होते.

फोटो ओळ:- गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मयत ऊस तोडणी मजुराच्या वारसास ३ लाख रुपयाचा धनादेश प्रदान करतांना मा.आ.अशोकराव काळे.
