जिनिंग प्रेसिंग सोसायटीची ६० वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांचे अध्यक्षतेखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने पार पडली.यावेळी अध्यक्षपदाची सूचना बशीर शेख यांनी मांडली सदर सूचनेस शिवाजीराव वाबळे यांनी अनुमोदन दिले.

        प्रास्ताविक करतांना संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार म्हणाले की, मागील वर्षात कापसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे जिनिंग प्रेसिंग प्रक्रिया कामकाज होऊ शकले नाही मात्र दूरदृष्टी असणाऱ्या मा. खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी जिनिंग प्रेसिंग सोसायटीला अनेक पूरक व्यवसाय करण्यासाठी पाठबळ दिल्यामुळे मा.आ.अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेला २८ लाख ८६ हजार रुपयांचा नफा झाला असून लेखा परीक्षणातून संस्थेला याहीवर्षी ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला असल्याची माहिती दिली.
             अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर सुरेश काशीद यांनी केले. सभेस ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असलेले सभासद दिलीप शिंदे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्याची सर्व सभासदांच्या वतीने सूचना मांडली त्या सूचनेस नंदकुमार चव्हाण यांनी अनुमोदन दिले. संस्थेचे संचालक भाऊसाहेब देवकर यांनी२०२०-२१या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.बी.शेख यांनी केले तर संचालक सचिन आव्हाड यांनी आभार मानले..

फोटो ओळ:- कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी आ.अशोकराव काळे समवेत संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *