तिळवण तेली समाजाच्या वतीने आ. आशुतोष काळेंचा सत्कार संपन्न..!

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील तिळवण तेली समाजाच्या मागणीची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी तेली समाजाच्या सभागृहासाठी १० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाभरातील तेली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी समस्त तेली समाज बांधवांच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.

महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आमदार सुधीर तांबे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव शहर व तालुका प्रांतिक तैलिक महासभा नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव’ सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की. तिळवण तेली समाज नेहमीच मा.खा. कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या सोबत राहिला असून आजही हा समाज मोठ्याप्रमाणात माझ्यासोबत आहे. तिळवण तेली समाजाची अनेक वर्षापासुनची सभागृहाची मागणी होती. त्या मागणीची पूर्तता करून सभागृहासाठी १० लाख रुपयाचा निधी दिला आहे. आजवर नेहमीच तिळवण तेली समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी प्राधान्य दिले असून यापुढील काळातही समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवून गरज भासल्यास अजून निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी प्रांतिक तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश गवळी यांची निवड झाल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी, ज्येष्ठ समाजसेवक बाळासाहेब लुटे, येवल्याचे नगराध्यक्ष बंडूशेठ क्षीरसागर, शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, संग्राम देशमुख, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, विभागीय कार्याध्यक्ष हरीभाऊ डोळसे, महिला विभागीय अध्यक्षा सौ. विद्याताई कर्पे, विभागीय उपाध्यक्ष विलास वालझाडे, माजी जिल्हाध्यक्ष भागवतराव लुटे, विभागीय सचिव रवींद्र कर्पे, गणेश पवार, मार्गदर्शक ज्ञानेश्वर महापुरे, प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. मीनाक्षी पेंडभाजे, युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घाटकर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप कर्पे, जिल्हा सचिव रामदास गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम सर्जे, विभागिय उपाध्यक्ष तुषार चौधरी, कोपरगाव तालुकाध्यक्ष सुमित क्षीरसागर, शहराध्यक्ष प्रसाद सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत लुटे, युवक शहराध्यक्ष अमोल महापुरे, सुरेश सोनवणे, राजेश वालझाडे, राजेंद्र राऊत, संतोष सोनवणे, डॉ.सुयोग पवार, गोकुळ कर्पे, संतोष कवाडे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

फोटो ओळ – आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करतांना प्रांतिक तैलिक महासभेचे पदाधिकारी व तेली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *