
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्यातील आंबेडकर प्रेमी बंधू भगिनींनी शासकीय नियमानुसार डॉ आंबेडकर जयंती साजरी करावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक झाली असून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा देसले साहेब यांनी शासकीय परिपत्रक वाचून जयंती साजरी करण्याचे नियम व अटी वाचून दाखवल्या असून पोलीस प्रशासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे परवानगी दिली आहे दि13 एप्रिल रोजी रात्री 12 वा फक्त बौद्ध पु.भंते आनंद सुमनसिरी, पु.भंते काश्यप, बौध्दाचार्य नानासाहेब जगताप, बौध्दाचार्य विजय भातनकर भिक्कु व बौद्धचार्य यांच्या उपस्थिती डॉबाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे वंदना होईल.
तर दि 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे तसेच आपल्या भागात रितसर परवानगी घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन कमीत कमी संख्येने उपस्थित राहून अभिवादन करायचे आहे त्या करिता सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे याची सर्व आंबेडकर प्रेमी नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच शक्यतो प्रत्येकाने आपापल्या घरी राहून सुरक्षित रित्या अभिवादन करावे व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असेही या पत्रकात म्हटले आहे
