
कोपरगाव प्रतिनिधी:-
राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात साहेब,आ.डॉ.सुधीरजी तांबे,आ.लहू कानडे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतजी तांबे,ज्ञानदेवजी वाफरे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे निरीक्षक डॉ.एकनाथजी गोंदकर,किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत साई श्रुष्टी लॉन्स येथे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुषार पोटे,कोपरगाव तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीनजी शिंदे,कोपरगाव काँग्रेस शहराध्यक्ष सुनीलजी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्स पाळून आढावा बैठक पार पडली.या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका काँग्रेस पक्षाची भूमिका,उमेदवार चाचपणी,पक्ष बळकटीकरण,पदाधिकारी निवड,कोपरगाव काँग्रेस मेळावा इत्यादी विषय बैठकीत यशस्वी पार पडले.तुषार पोटे यांनी प्रास्ताविक करत भूमिका मांडली.नितीनराव शिंदे यांनी तालुक्यातील काँग्रेस पक्षाची वाटचाल स्पष्ट केली.यावेळी किसन काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी विजयराव जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.निरीक्षक डॉ.एकनाथ जी गोंदकर यांनी पूढील पक्षाची रणनीती स्पष्ट केली व शिस्तप्रिय पद्धतीने एकजुटीने कोपरगाव काँग्रेस ची वाटचाल असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.विक्रम नवले यांनी जिल्हाभर किसन काँग्रेसच्या माध्यमातून संघटना बळकटीकरण करणार असल्याचे सांगत कोपरगाव मध्ये देखील किसान काँग्रेस चांगले काम करेल अशी आशा व्यक्त केली.यावेळी काँग्रेस अनुसूचित विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बागुल,काँग्रेस अनुसूचित विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र साबळे सर,तालुका काँग्रेस सचिव चंद्रहार जगताप,आकाश संजय नागरे,किसान काँग्रेसचे समन्वयक शिवाजीराव नेहे,गौरव सानप,प्रशांत अहिरे तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते
