
कोपरगाव प्रतिनिधी:-
नमस्कार कोपरगावकर,
तुमची जबाबदारी घराबाहेर न पडण्याची आम्ही घेतो जबाबदारी तुम्हाला घरपोच सेवा देण्याची…
तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक वस्तू या तुम्ही कोपरगावातील दुकानदारांकडे ऑर्डर करा, त्याचे ऑनलाईन पेमेंट करा किंवा आपले समान घेवून आलेल्या माणसाकडे पेमेंट द्या, ती वस्तू तुमच्या पर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी आम्ही विनामूल्य घेत आहोत…
तुम्ही खरेदी केलेले सामान कोणत्या दुकानातून कुठे पोहोच करायचे हे आम्हाला खालील नंबर वर कळवा. लगेचच समताचे प्रतिनिधी आपली वस्तू लवकरात लवकर आपल्या पर्यंत पोहोच करतील. ( सर्व अत्यावश्यक वस्तू जसे की किराणा, औषधे, भाजीपाला, फळे यांची घरपोच सेवा विनामूल्य असेल. )
आपल्याला सर्वांना मिळून ही कोरोनाची साखळी तोडायचीच आहे…
