
कोपरगाव प्रतिनिधी:-
सत्य हे अंतिम असते याचाच प्रत्यय आज सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाने आला आहे.
भुजबळ कुटुंबियांवर सूडबुद्धीने कारवाई होत आहे असे वारंवार आम्ही सांगत होतो. त्याच्या निषेधार्थ आम्ही वेळोवेळी रस्त्यावर उतरून आंदोलने देखील केली होती. आज सत्र न्यायालयाने पालकमंत्री ना.छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह इतरांना दोषमुक्त केले आहे. “भगवान के घर देर है, पर अंधेर नही !” न्यायालयाच्या निर्णयाने राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवारात आनंदाचे वातावरण असून ढोल-ताश्यांच्या गजरात, गुलाल उधळत व पेढे वाटत निकालाचे स्वागत केले आहे.
-अॅड.रविंद्रनाना पगार
नाशिक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस



फोटो ओळी- राष्ट्रवादी भवन येथे पेढे वाटून व फटाके फोडून मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, संजय खैरनार, गणेश गायधनी, प्रफुल्ल पवार, संदीप भेरे, सचिन पवार, महेश शेळके, शहाबाद सय्यद,अक्षय काहंडळ,भावेश मांडलिक, अतिश शिंदे, अमोल संधान, सागर बेदरकर, बालम पटेल, नितीन अमृतकर, हर्शल चव्हाण, कृष्ण काळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत आहेत.
