श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय शिक्षक दिन उत्साहाने संपन्न..!

कोपरगाव

शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असुन त्यामुळेच संस्कारक्षम समाजाची बांधणी होते…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ५सप्टेंबर डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून उत्साहाने संपन्न झाला.
श्री.गो.विदयालयात डाॕ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.दिलीपकुमार अजमेरे यांच्या हस्ते झाले.
या वेळी समता पतसंस्थेच्या कोपरगांव शाखाचे शाखाधिकारी श्री.आप्पासाहेब कोल्हे,गांधी चौक शाखेचे शाखाधिकारी श्री.योगेश मोरे यांनी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर आणि उपस्थित शिक्षकांचा समता पतसंस्था वतीने सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.
शिक्षक विदयार्थीं घडवतांना पुर्ण मेहनत घेतात.शिक्षक समाज घडवतात त्यातुनच संस्कारक्षम समाजाची बांधणी होते असे प्रतिपादन श्री.दिलीपकुमार अजमेरे यांनी केले.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातुन घडलेल्या विदयार्थीमध्ये कुलगुरु पासुन ते आदर्श शिक्षकांची मोठी परंपरा आहे व हे विदयार्थी देश पातळीवर शाळेचे नांव उंचावत आहे असे त्यांनी सांगितले.
समताचे शाखाधिकारी श्री. योगेश मोरे यांनी मी या शाळेचाच विदयार्थी असुन शाळेतील संस्कारामुळेच मी घडलो असे सांगितले.या वेळी सर्व शिक्षकांना गुलाबपुप्प देवुन त्यांचा गौरव करण्यात आला,
विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दील्या.
उपमुख्याध्यापक श्री.रवी पाटील यांनी स्वागत केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गोरे एस.डी यांनी केले . शेवटी पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला श्री.तुपसैंदर डी.व्ही,एन.के.बडजाते ,जाधव ई.एल,कोताडे ए.जे.,अमृतकर ए.बी.,गवळे वाय.के. आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद,तसेच समता पतसंस्थेचे अक्षय कुलकर्णी,श्री.राजेंद्र धाकतोडे,श्री.अखिलेश आव्हाड,श्री.शिवाजी वाघमारे,श्री.सागर केकाण,श्री.संतोष इखणकर सोशल डीस्टन्सिंग पाळुन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *