मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यामानें आयोजित श्री. साई सच्चरित्र पारायण सोहळ्याची गुरूवारी दि.२ सप्टेंबर रोजी समाप्ती..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्याची भूमि संत महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमिका असुन कोपरगाव दक्षिण भारताची काशीही म्हटले जाते.अशा या पावन भुमीत गेल्या १६ वर्षापासून मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतिने साई चरित्र पारायण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. सालाबादप्रमाणे श्रावण मासा निमित्त गुरुवार दि. २६/८/२०२१ ते गुरुवार दि. २/९/२०२१ या कालावधीत पारायण सोहळा आयोजित केला होता.२/९/२०२१ रोजी श्री साईसच्चरित्र पारायण सोहळा कार्यक्रम संपन्न होत असुन गुरवारी दिंनाक २ सप्टेबर रोजी पारायणाची समाप्ती आहे.

भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकाकडुन आवाहन करण्यात येत आहे.साईसच्चरित्र पारायण सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा झाला असुन . सुवर्णकार भवन, सराफ बाजार, कोपरगांव, जि. अ. नगर या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पडला असुन श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन केले असुन महाप्रसाद गुरुवार दि. २/९/२०२१ रोजी कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावामुळे महाप्रसाद घर पोहोच करण्याचे योजीले आहे.भाविकांना महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.उपनगराध्यक्ष योगेश भाऊ बागुल यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *