
कोपरगाव प्रतिनिधी:-
लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ कोपरगाव ,हिरो सायकल, रेनबो इंटरनेशनल स्कूल , न्यू हिंदी सायकल शॉप यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या महोत्सवाच्या निमित्ताने भव्य सायकल रॅली शनिवारी 14 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सहा वाजता आयोजित केली होती. यावेळी रॅलीतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संतुलन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.


सदर रॅली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुरू होऊन ,एस जी विद्यालय रोड,श्रीराम मंदिर रोड, निवारा,खडकी रोड,साइसिटी,येवला नाका, कोपरगाव मेन रोड हुन पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदाना येथे रॅली ची सांगता करण्यात आली.यावेळी सायकल रॅलीत सहभाग घेणाऱ्या ना लकी ड्रॉ पध्दतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच कोपरगाव ते पंढरपूर सायकल यात्रा करणाऱ्या टीमचे ही यावेळी सत्कार करण्यात आले, यावेळी प्रमुख उपस्थितीती दौलतराव जाधव (पोलिस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन) , राम थोरे( अध्यक्ष लायन्स क्लब कोपरगाव), आदित्य गुजराती (अध्यक्ष कोपरगाव लिओ क्लब), आकाश नागरे (संचालक इंटरनॅशनल स्कूल) ,शैला झुंजारराव, धनंजय सावजी (प्रोप्रायटर न्यू हिंदी सायकल शॉप) ,राजेश ठोळे, पराग संधान,प्रसाद नाईक,संजय काळे,परेश उदावंत ,सुमित भट्टड,अक्षय गिरमे,पृथ्वी शिंदे,मनन ठोळे, सम्यक गंगवाल,सुरेश शिंदे, पंकज ठोळे रवींद्र नेवगे,अप्पासाहेब शिंदे,भीमजीभाई पटेल,विजय नानकर,प्रसाद भास्कर,प्रशांत भास्कर,सोमनाथ सोनवणे,भरत अजमेरे, राजेश जाधव,रुपेश शिरोडे आदीजण या वेळी उपस्थित होते
