को-केअर ॲपचे माध्यमातून आरोग्य सेवा केंद्रांची माहिती तातडीचे सेवेसाठी सर्वांना उपयुक्त ठरेल:- तहसिलदार योगेश चंद्रे…

कोपरगाव

१२ वर्षांच्या मनस्वी मंदार आढाव हिने निर्मिती केलेल्या कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारा KoCARE ॲपचे तहसिलदार योगेश चंद्रे साहेब यांचेकडून कौतुक…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोविड आणि कोविड व्यतिरिक्त आजारांवर रुग्णालयांची इत्यंभूत माहिती देणारा को-केअर ॲपचे माध्यमातून रुग्णांना दिलासा मिळेल.कु.मनस्वी आढाव हिने को-केअर ॲपचे निर्मितीतून कोविड हाॅस्पिटल आणि रुग्णसेवेशी निगडित इतर माहितीचे नागरिकांना उपलब्ध केलेले को-केअर दालन कौतुकास्पद असल्याचे तहसिलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

कोपरगाव तालुक्यातील कु.मनस्वी मंदार आढाव या १२ वर्षांच्या लहान मुलीने कोपरगाव तालुक्यातील वैद्यकीय सेवेची माहिती देणारा KoCARE ॲप तयार केला आहे.या ॲपची सुरुवात शिर्डी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आली होती.
को-केअर ॲपची निर्मिती कु.मनस्वीने सुमारे ३ महिणे अहोरात्र मेहनत घेऊन पुर्ण झालेवर तहसिलदार योगेश चंद्रे यांना दाखविला आहे.१२ वर्षांची मनस्वी कोपरगाव तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेची माहिती देणारा मोफत ॲप कुतुहलाने पहाणी करत कौतुक केले.
या प्रसंगी विशेष आरोग्य अधिकारी डॉ.वैशाली बडदे(आव्हाड) मनस्वीचे वडील मंदार आढाव, सूर्यतेज संस्थापक व समन्वयक सुशांत घोडके,चि.अमन आढाव,कु.राजहंस आढाव उपस्थित होते.

KoCARE ॲप आरोग्य विषयक कोपरगाव तालुक्यातील आरोग्य व रुग्णालय यांची माहिती देणारा आहे.मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये यांची निर्मिती केली असून या ॲपमध्ये कोविड उपचाराकरिता कोपरगाव तालुक्यातील व तालुका बाहेरील रुग्णालय यांची नावे,पत्ता, उपलब्ध बेड,हाॅस्पिटलचा फोन नंबर,डॉक्टरांचा फोन नंबर उपलब्ध आहे.तसेच कोरोना व्यतिरिक्त(स्त्री रोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, हृदय रोग तज्ञ, सर्पदंश तज्ञ, त्वचारोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, अस्तीविकार तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ,भूल तज्ञ ही वैद्यकीय सेवा देणारे हाॅस्पिटलची नावे,पत्ता, उपलब्ध बेड,हाॅस्पिटलचा फोन नंबर,डॉक्टरांचा फोन नंबर…)अशी माहिती उपलब्ध असणार आहे.तसेच सोनोग्राफी व रेडिओलॉजी केंद्र,सिटीस्कॅन,रक्तपेढी, रुग्णवाहिका यांचे मोबाईल नंबर उपलब्ध असणार आहे. तसेच यासह कोपरगाव तालुका व तालुक्या बाहेरील आरोग्य सुविधा देणारे रुग्णालयांची नावे मोबाईल नंबर उपलब्ध असणार आहेत.

कु.मनस्वी हीने सदर ॲप तयार करतांना तीन महिने माहिती संकलन आणि मेहनत घेतली आहे.या कामात कु.मनस्वी हीस हैदराबाद येथील व्हाईट हॅट ज्युनिअर मार्गदर्शक शिक्षिका मोनिका सिंग, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कु.मनस्वी ही कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष व मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अॅड.शंकरराव आढाव व प्रगतशील शेतकरी सौ.रंजनाताई शंकरराव आढाव, यांची नात असून प्रसिद्ध उद्योजक वैभवराव आढाव यांची पुतणी आहे.मनस्वीची आई सौ.जान्हवी व काकू सौ.गितांजली आढाव या सर्वांनी मनस्वी हीस प्रोत्साहन दिले आहे.

को केअर ॲपचे निर्मिती बद्दल कु.मनस्वीचा पुष्पगुच्छ देवून तहसिलदार योगेश चंद्रे यांनी सन्मान केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना रुग्णसेवेसाठी ko CARE ॲप सेवा मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल कु.मनस्वी हिचे कोपरगाव तालुक्यातील प्रशासनाने स्वागत केले असून नागरिकांकडून कौतुक होत आहे.

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांनी Google Play store येथे जाऊन KoCARE ॲप सेवा मोफत आपल्या मोबाईलवर कार्यान्वित करुन घ्यावी.असे आवाहन करण्यात येत आहे.
KoCARE ॲप link 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.KoCARE.Thunkable

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *