महाशिवरात्री निमित्त गुरु शुक्राचार्य मंदिरात भाविकांची मांदिआळी दर्शन व पुजेसाठी भाविकांनची मोठी रीघ:-शुक्राचार्य मंदिर अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड…

कोपरगाव

महाशिवरात्री निमित्ताने बाळासाहेब आव्हाड यांनी भाविकभक्तांना दिल्या मंगलकामना शुभेच्छा….

कोपरगाव प्रतिनिधी :-
कोपरगाव शहराजवळील गोदावरी नदीच्या तिरावर बसलेल्या बेट भागात महाशिवरात्रीचा उत्सव यंदा माघ वद्य चर्तुदशी शके १९४३ मंगळवार दिनांक १ मार्च २०२२ रोजी पहाटे ४.३० वाजता मंदिर उघडले व लघुवृद्राची तयारी सकाळी ०६.००ते ८.३० वाजेपर्यंत चालली त्या नंतर महाआरती करण्यात आली यावेळी या पुजेचा मान कोपरगाव पंचक्रोशितील भाविक .रवी माळी यांना मिळाला प्रथेनुसार १२ वाजता आरती केली जाते.१२ वाजता दर्शन रांगेत पहिल्या पायरीवर जो भाविक असेल त्या भाविकाला आरतीचा मान दिला जातो त्याच बरोबर प्रमुख पाहुणे आरतीसाठी दिपकभाऊ वाजे सनीभाऊ वाघ शंकरभाऊ वाणी यांनाही आरतीचा मान मिळाला त्या नंतर ०९.०० वाजता सामुदायिक अभिषेकाची सुरवात डाॕ.रामदास आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आली

ही पुजा रात्री उशिरा पर्यत चालु होती.या महाशिवरात्रीला नामदार आशुतोष काळे यांनी दर्शन घेवुन उपस्थिती दर्शविली तसेच गुरु महारांजाचा मुखवटा सकाळी गंगा गोदावरी माता या मंदिरात भाविकांच्या दर्शना साठी ठेवण्यात आला होता तसेच दुपारी १२.०० वाजता महाआरती करण्यात आली यानंतर दुपारी ०४.०० वाजता महाराजांची पालखी वाजत-गाजत गोदावरी नदी तीरावर शुक्राचार्य घाट व संजीवनी विद्या घाट येथे महापालखी जाते व तेथे गंगा गोदावरी मातेची भेट होऊन पूजा व आरती होते यावर्षी या पुजेचा मान बिपिन दादा कोल्हे यांना मिळाला त्यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले त्यानंतर सूर्य अस्त होण्याअगोदर महाराजांची पालखी वाजत-गाजत पुन्हा मंदिरात आणली जाते त्यानंतर रात्री नऊ वाजता महा रुद्रा अभिषेक करण्यात आला. तो मध्यान रात्रीपर्यंत म्हणजेच एक वाजेपर्यंत चालू राहतो त्यानंतर महाराजांना वस्त्र अलंकारांनी सजविले जाते व ते रूप पाहण्यासाठी रात्री एक वाजता कोपरगाव शहरासह तालुक्यातील व इतर जिल्ह्यातील भाविक भक्त महाराजांचे रूप पाहण्यासाठी आतुरतेने त्या वेळेची वाट बघत असतात त्यानंतर रुद्र अभिषेक करताना ज्या वस्तू वापरल्या जातात त्या वस्तूंचा महाप्रसाद तयार करून उपस्थितीत भक्तांना महाप्रसाद म्हणून वाटला त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर गंगा गोदावरी मातेची पूजा केली जाते त्याला (ळळीत) म्हणतात त्यानंतर येणाऱ्या रविवारी म्हणजे दि.०६.०३.२०२२ रोजी चालत आलेल्या परंपरेनुसार भाविक भक्तांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करून आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे

या सदर कार्यक्रमासाठी परमसद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळुजी आव्हाड व संस्थेचे विश्वस्तअॅड.एस.डी. कुलकर्णी,अॅड.जी.व्ही. कोऱ्हाळकर, सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब म्हाळुजी आव्हाड, तसेच स्थानिक कमिटी मेंबर- सचिन परदेशी, डॉ.श्री.रामदास आव्हाड व सौ.अंजली रामदास आव्हाड, प्रसाद पन्हे, राजेंद्र (मुन्ना) आव्हाड, भागचंद रूईकर, विशाल राऊत, बाळासाहेब लकारे, बाळासाहेब गाडे, मधुकर साखरे, संजय वडांगळे, भाऊसाहेब आव्हाड, नरेंद्र आव्हाड, महेंद्र नाईकवाडे, विलास आव्हाड, दिलीपराव सांगळे, रविंद्र आढाव, विलास आव्हाड, तुषार आव्हाड, विकास शर्मा, मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा, मंदिराचे पुजारी नरेंद्र जोशी,संजय रोडे,राजेंद्र कुलकर्णी व नागरीक यावेळी मोठ्या संखेने यावेळी उपस्थित होते

आलेल्या मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी केले.तसेच भाविकासांठी सामुदायिक अभिषेक सोहळा करण्यात आला. अभिषेक सोहळ्याचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *