
कोपरगाव प्रतिनिधी:-
नगराध्यक्ष झाल्यापासून आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवकांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे काही नगरसेवक अपक्ष नगरसेवक व जनता माझ्यासोबत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. मात्र कोल्हे गटाचे काही नगरसेवक पोरकट नेत्याच्या पोरकट आदेशाने सातत्याने विकासकामात अडथळे आणीत असल्यामुळे विकासकामे सुरु होण्यात विलंब होत आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होणार आहे याची जाणीव ठेवा.आपल्या पोरकट नेत्याचे पोरकट आदेश मानू नका, मोठ्या पणाने वागा आणि शहराच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना केले आहे.

कोपरगाव येथे आज आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत ३ कोटी ५६ लाख २० हजार रुपये निधीतून प्रभाग क्र. ३ मध्ये येवला नाका ते मार्केट यार्ड व मार्केट यार्ड ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, प्रभाग क्र. ६ मध्ये एस.जी. विद्यालय ते हेम मेडिकल, अहिंसा स्तंभ ते आठरे घर रस्त्याच्या मजबुतीकरण खडीकरण, डांबरीकरण, रुंदीकरण कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरातील विकासकामे करण्याच्या बाबतीत अनेकवेळा स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली, सर्वसाधारण सभेत चर्चा झाली व जिल्हाधिकाऱ्यांसमोर देखील दोनवेळा सुनावणी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात विकासकामे करण्यास हिरवा कंदील दिला असतांना देखील कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी मुर्खपणा करून हि विकासकामे करू नये अशा आशयाचे पत्र कोपरगाव नगरपरिषदेला आणून दिले यावरून त्यांना शहरविकासाची किती –याची कल्पना येते. खेळीमेळीच्या वातावरणात कोपरगाव शहराचा विकास होणे हि सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित आहे. सभागृहातील चर्चा,वादविवाद, ठराव, व जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय देवून देखील कोपरगाव शहराचा जाणीवपूर्वक विकास होवू द्यायचा नाही या उद्देशातून सर्व प्रकारचे निर्णय होऊनसुद्धा वारंवार विकासकामात अडथळे आणले जात आहे.कोपरगाव शहरातील सर्व मुख्य रस्ते झाले तर आमदार आशुतोष काळे व नगराध्यक्षांना श्रेय मिळेल या भीतीपोटी श्रेयाच्या राजकारणातून किळसवाने प्रकार चालविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून यापुढे विकासकामात अडथळे आणू नका नाही तर येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही असा ईशारा वहाडणे यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना यावेळी दिला.
यावेळी बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, हाजी महेमूद सय्यद, सौ. प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगूले, सौ. सपना मोरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, भरत मोरे, दिनकर खरे, रमेश गवळी, विनायक सरोदे, कृष्णा आढाव, रोहित पटेल, वाल्मीक लहिरे, जावेद शेख, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, मुकुंद इंगळे, प्रशांत वाबळे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी, रशीदभाई शेख, लक्ष्मण सताळे, रवींद्र राऊत, एकनाथ गंगूले, राहुल देवळालीकर, तेजस देवळालीकर, राकेश शहा, डॉ. तुषार गलांडे, समीर वर्पे, आकाश डागा, योगेश खालकर, योगेश नरोडे, संतोष दळवी, चंद्रशेखर मस्के, संदीप सावतडकर, संतोष शेजवळ, विजय खेडेकर, वाल्मिक चांदर, सचिन मोरे, राजेंद्र बोरावके, निखिल डांगे, दिनेश पवार, सागर लकारे, रावसाहेब साठे, अनिरुद्ध काळे, तुषार सरोदे, अभिजित सरोदे, मनोज कपोते, सुनील फंड, महेश उदावंत, विकी जोशी, बाळासाहेब शिंदे, संतोष टोरपे, दिनेश संत, दीपक देशमुख, विजय दाभाडे, चांदभाई पठाण, विकास बेंद्रे, शंकर घोडेराव, निलेश उदावंत, बाळासाहेब साळुंके, प्रफुल शिंगाडे, विकास शर्मा, इरफान शेख, सुरेश हलवाई, राहुल हंसवाल, रंजीत गंगूले, सुधीर खरे, तेजस गंगूले, मनोज खिलारी, फिरोज पठाण, अशोक भंडारी, गौरव पांडे, बाळासाहेब बागरेचा, घनश्याम परदेशी, विनायक गायकवाड, राजेंद्र खैरे, पी.एम. पाटील, विनीत वाडेकर, योगेश वाणी, नंदू बागरेचा, चेतन खुबाणी, संजय कांबळे, संजय कानडे, वसंत जाधव, जवाहर शहा आदी उपस्थित होते.

चौकट – कोपरगाव शहराचा विकास व्हावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी आणला आहे व यापुढे देखील शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.कोरोनाच्या संकटात देखील आमदार आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून शहरविकासासाठी निधी आणला आहे त्यामुळे सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी विकासकामात राजकारण न आणता जनतेचे हित लक्षात घेऊन विकासकामांना सहकार्य करावे-सुनील गंगूले (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस)
