कोपरगावात हिंदू मुस्लीम एकोप्याचे दर्शन मनाला सुखावणारं:- आ.आशुतोषदादा काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- संपूर्ण विश्वात भारत हा एकमेव असा देश आहे या देशात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. कोपरगावात देखील सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात. हिंदू, मुस्लीम बांधव सण एकत्रितपणे साजरे करून एकमेकाच्या सुख-दु:खात मदत करतात. हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन मनाला सुखावणारं असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव शहरात हजरत अबु हुरैरा मदरसा येथे आयोजित ‘अजिमोशान सालाना जलसा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, हिंदू-मुस्लिम बांधवांचे एकोप्याचे दर्शनातून सामाजिक सलोखा जपला जात आहे. परधर्माचा आदर करण्याची परंपरा देशाची अखंडता, एकता टिकवून ठेवण्यासाठी अतिशय मौल्यवान असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी मौलाना शाबिर, मौलाना हमीद, उमर हाजी साहाब, अल्ताफभाई खाटीक, शब्बीरभाई खाटीक, रहेमानभाई पठाण, इम्रानभाई मन्सूरी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नगरसेवक अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, जावेद शेख, सद्दाम सय्यद आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *