कोेरोना महामारीत संपत्तीपेक्षा आत्मशक्ती महत्वाची:-सौ.स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव

धामोरीत 45 लाख रूपये खर्चाच्या विकासकामांचे लोकार्पण..!!

कोेपरगांव प्रतिनिधी:-
कोरोना वैश्विक महामारीत रक्ताची नाती दुरावली, जीव धोक्यात असतांनाही ग्रामिण भागातील अंगणवाडीताई, आशासेविका, आरोग्य उपकेंद्राचे दुत, शासकीय निमशासकीय कर्मचारी, खाजगी वैद्यकिय तसेच औषध विक्रेते, तलाठी, ग्रामसेवक, वीजतंत्रज्ञ, पोलिस पाटील, कोरोनायोध्दे, पोष्ट कर्मचारी या सर्व ज्ञात अज्ञात घटकांच्या योगदानाचे मोल पैशात होवुच श्कत नाही, कोरोनात संपत्तीपेक्षा आत्मशक्ती महत्वाची असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता केाल्हे यांनी केले.
तालुक्यातील धामोरी येथे स्थानिक, ग्रामविकास निधीतुन 20 लाख तर नव्यांने होत असलेल्या 25 लाख रूपये खर्चाच्या सामाजिक सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते गुरूवारी झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कोविड योध्दयांचा संजीवनी युवा प्रतिष्ठान, उद्योग समुह व धामोरी वासियांच्यावतींने सन्मान करण्यांत आला. प्रारंभी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे माजी उपाध्यक्ष कैलास माळी व अशोकराव भाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी सरपंच राहुल वाणी व उपसरपंच प्रभाकर मांजरे यांनी कोल्हे यांच्या विकास कामांची माहिती दिली. धामोरी येथे कोपरगांव बाजार समितीचे उपकेंद्र व्हावे यामागणीचे निवेदन देण्यांत आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, माजी उपसभापती वैशाली साळुंके, कोल्हे कारखान्यांचे संचालक मनेश गाडे, बाजीराव मांजरे, सुनिल वाणी, सोमनाथ चांदगुडे, विजय जाधव, पोलिस पाटील संगिता ताजणे, प्रकाश वाघ, माजी उपसरपंच बाळासाहेब अहिरे, पांडुरंग पगार, विश्र्वास गाडे, खंडेराव पगार यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कोरोनायोध्दे बाळासाहेब अहिरे व बाबासाहेब गांगुर्डे यांनी अनुभव सांगितले. भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीसपदी निहाल शेख यांची निवड झाल्याबददल त्यांचा यावेळी सौ. कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, भारतीय जनता पक्ष समर्थ बुथ अभियानातुन एकमेकांची मने जोडुन उत्कर्षाची विचारधारा त्यांच्यापर्यंत नेण्यांचे काम आपण करत आहोत. माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शना खाली कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या विकासाचा ध्यास घेत गेल्या पाच वर्षात प्रचंड कामे केली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी मतदार संघातील सर्व माणसं ही आपली असून त्यांच्या सुख-दुःखात कधीही अंतर द्यायचे नाही ही शिकवण दिली, त्यातुनच आपल्याला प्ररेणा मिळत गेली आणि अल्पसा आधार देण्यांचा प्रयत्न करत आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आपत्तीत 80 कोटी जनतेला उपाशीपोटी न ठेवता त्यांच्यापर्यंत स्वस्त धान्य दुकानाअंतर्गत मोफत शिधा पोहचविला, वैश्विक महामारीत देश सुरक्षीत ठेवण्यांचे काम ते करत आहेत. कोपरगांव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात वाडया वस्त्यावर आपल्यापरींने विकासाचा निधी पोहोचविण्यांचा प्रामाणिक प्रयत्न केला असुन उर्वरित विकासकामांचे प्रस्ताव देत त्यासाठी निधीच्या तरतुदीबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा होत आहे. मतदार संघातील वीज, पाटपाणी आणि आरोग्याच्या प्रश्नांची सोडवणुक व्हावी म्हणुन संबंधीत कार्यान्वयीन यंत्रणेस पत्रव्यवहार सुरू असुन धामोरी व अन्य दोन गांवच्या वीजउपकेंद्र निर्मीतीचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचेही त्या म्हणांल्या. शेवटी माजी उपसभापती वैशाली साळुंके यांनी आभार मानले.

चौकट:-
कोरोना वैश्विक महामारीत ग्रामिण भागातील डाॅक्टर, नर्स, आशासेविका, अंगणवाडीताई, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आदि घटक देवमाणसं असुन त्यांनी अनेकांना जीवनदान दिले असल्याचे सौ. कोल्हे म्हणांल्या.

फोटोओळी-कोपरगांव:-
तालुक्यातील धामोरी येथे ग्रामविकास निधीअंतर्गत 45 लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *