
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या (तांडेल बंगला) नूतनीकरण कामाचे लोकार्पण १५ ऑगस्ट रोजी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या शुभहस्ते पार पडले.


यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.आर. पाटील, तहसिलदार योगेशजी चंद्रे, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनरावजी काळे, पोलीस निरीक्षक वासुदेवजी देसले, मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकररावजी रोहोम, पंचायत समिती सदस्य अनिलजी कदम, श्रावणजी आसने, रोहिदासजी होन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, नगरसेवक गटनेते विरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, राजेंद्रजी वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
