के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा….

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कोपरगाव येथील के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२१ , १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेट वर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे. 

१२ वी विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचा निकाल 100 % लागला असून खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.

१२ वी विज्ञान:-

१.

कु. अरगडे सायली संजय

एकूण टक्के – 95.17 %

२.

कु. बोधे सिद्धी अतुल

एकूण टक्के – 94.17 %

३.

रक्ताटे वैभव संजय

एकूण टक्के – 93.67 %

१२ वी वाणिज्य:-

१.

वाव्हळ समाधान धर्मराज

एकूण टक्के – 93.17 %

२.

कु.काळवाघे वैष्णवी हर्षवर्धन

एकूण टक्के – 91.33 %

३.

कु.सुरासे विभूती गोविंद

एकूण टक्के – 91.17 %

३.

कु.जगताप प्रियंका महादेव

एकूण टक्के – 91.17 %

१२ वी कला:-

१.

कु. साबणे दिव्या सुनील

एकूण टक्के – 94.33 %

२.

कु.पंडोरे गौरी प्रकाश

एकूण टक्के – 86.00 %

३.

कु.उगले गायत्री संजय

एकूण टक्के – 85.33 %

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री. अशोकराव रोहमारे, उपाध्यक्ष मा. श्री. रामदास पा. होन, सचिव मा. श्री. ऍड. संजीव कुलकर्णी, श्री. संदीप रोहमारे, संस्थेचे सर्व विश्वस्थ तसेच प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उप.प्राचार्य प्रा. सोनवणे बी. आर., अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

                 वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया ऑनलाइन पद्धतीने kjs.vriddhionline.com या वेबसाईट वर सुरु झाली असून महाविद्यालयाचे पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट  करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी ए._सीए., बी. सी.एस., बी. एस. एस्सी. (सूक्ष्म जीवशास्त्र) इत्यादी चालू आहेत. प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन त्वरित प्रवेश घ्यावा असे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *