
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना संकट काळात स्वतः चा जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका, परिचारिका, पोलीस भगिनी तसेच विविध सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या महिलांचा पाठीराखा म्हणून त्यांच्या कार्याला रक्षाबंधनानिमित्त वंदन करतो असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व संजिवनी युवा प्रतिष्ठानचेअध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.
बहीण भावाचे पवित्र नात्याची आठवण राखी पौर्णिमेतून सर्वांनाच होते. तालुक्यातील सर्व कुटुंब बहिणी प्रमाणे आपण मानतो. हा पवित्र धागा सामाजिक जाणिवेची ऋणानुबंध जपण्याचे संस्कार अधोरेखित करत असतो. विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी कोरोना संकट काळत केलेले कामाचा आपण जवळून साक्षीदार असून या महिला आपले घर कुटुंब सांभाळून समाजाला जपण्यासाठी अपार कष्ट घेतात, याची जाणीव ठेवून औपचारिकपणे नव्हे तर दैनंदिन आयुष्यात त्यांचा सन्मान राखला पाहिजे. महिलांना समाजात मानाचे स्थान देऊन त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी महिला रक्षणाचा आमूलाग्र विचार जपणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आदीं महापुरुषांच्या विचारांची क्रांती महिला सन्मानासाठी दिशादर्शक आहे. हा विचार सर्वांनीच जपला पाहिजे.
संकटे माणसाला माणूसपण, ऐक्य, परोपकारची शिकवण देत असतात. कोरोना काळात सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या भगिनी या तारेवरची कसरत करत सर्वांची काळजी घेत, घर कुटुंब सभालुवआहेत सेंटरवर सेंटरच्या माध्यमातून अनेक भगिनींना जपता आले व या कामात सर्वांची साथ मिळाली याचे आत्मिक समाधान असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देशवासीयांसाठी एक धागा या उपक्रमातून येथील माता भगिनींच्या राख्या संकलित करून त्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांपर्यंत पोहचविल्या असून सांगली, सातारा, या भागात नुकताच महापुर आला होता त्यांनाही थेट मदत दिली होती या बाबींनाही कोल्हे यांनी उजाळा दिला.
