टाळे ठोकण्याचा अल्टीमेटम देताच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ टाळयावर:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील काकडी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे थकीत ४ कोटी २ लाख ४८ हजार रूपयांची ग्रामपंचायत कराची रक्कम १५ दिवसात मिळाली नाही तर काकडी विमानतळाला टाळे ठोकण्याचा अल्टीमेटम दिला होता त्यावर त्यांनी कुठलीही कार्यवाही करू नये असे लेखी पत्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादितचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.
ते म्हणाले की, काकडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ पुर्वा रविंद्र गुंजाळ व ग्रामपंचायत सदस्यांचे शिष्टमंडळासह शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाकडे २०१६.१७ पासुन थकीत असलेल्या ४ कोटी २ लाख ४८ हजार ५६ रूपयांची ग्रामपंचायत थकीत कर रक्कम मिळावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला होता, ही रक्कम न मिळाल्याने ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते, पाणी, आरोग्य, वीज, शाळा अन्य विविध विकासाच्या योजना राबवितांना अडचणी येतात म्हणुन ही रक्कम तातडीने मिळावी म्हणून संबंधीत यंत्रणेकडे त्याचप्रमाणे शासन स्तरावर, मंत्री व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता शेवटी नाईलाज म्हणून आपण स्वत: प्रसारमाध्यमापुढे याबाबत ठोस भूमिका मांडुन काकडी शिर्डी विमानतळ व्यवस्थापनास ही वसुली न झाल्यास टाळे ठोकण्यांचा जाहिर इशारा देवुन औरंगाबाद येथील विधीज्ञ राहुल टेमक यांच्यामार्फत ११ ऑक्टोंबर रोजी नोटीस बजावली होती.
त्यावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांनी काकडी ग्रामपंचायत थकीत कर रक्कम मागणीचा प्रस्ताव तयार करून तो शासनस्तरावर सादर केला असुन थकीत कर आकारणी रक्कम ४ कोटी २ लाख ४८ हजार रूपयाबाबत तुर्तास कुठलीही प्रकारची कार्यवाही करू नये म्हणून २९ ऑक्टोंबर २०२१ रोजी पत्र देवुन विनंती केलेली आहे तेंव्हा संबंधीत कार्यान्वयीन यंत्रणेने काकडी ग्रामपंचायतीचे सन २०२२ पर्यंतची थकीत कर रक्कम ५ कोटी ९ लाख ३८ हजार ९१६ रूपये तातडींने अदा करावी की, जेणेकरून त्याचा उपयोग काकडी मल्हारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विकास कामांना होणार आहे. ही रक्कम लवकरात लवकर मिळाली नाही तर पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठवू असेही विवेक कोल्हे शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *