कृषीकन्येकडून ब्राम्हणगाव येथे माती परिक्षण प्रात्यक्षिक..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (ब्राम्हणगाव):-
महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या प्रांजल शिंदे हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगीक संलग्नता या कार्यक्रमांतर्गत अभ्यास दौऱ्यात कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे माती परिक्षण प्रात्यक्षिक दाखवत शेतकयांना मार्गदर्शन केले.

कृषीकन्या प्रांजल शिंदे हिने शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे फायदे, मातीत आढळणारे विविध पोषक घटक व त्यांचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. सध्याचा मृदेचा होणारा ऱ्हास व माती परिक्षण शिबिरांची गरज.माती परीक्षण कसे आणि का करावे ? याचे बहुमोल मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित शेतकयांनी तिचे कौतुक ही केले आणि तिला पुढील अभ्यास दौर्यास शुभेच्छा दिल्या.शेतकऱ्यांनी सुद्धा या कार्यशाळेत बहुमोल असा प्रतिसाद नोंदवला. प्रांजलला या सर्व कार्यशाळेस क. का. वाघ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिषकुमार हाडोळे प्रा. परमेश्वरी पवार व प्रा. सुनील बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *