बैल पोळा; एक उत्सव:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- माणूस उत्सव प्रिय प्राणी आहे माणसाने जीवन जगत असताना झाडे पाने पशूपक्षी देवस्थानी माणून वेळोवेळी अनेकदा त्यांच्या पूजा करून रक्षण करण्यासाठी संगोपन जतन करण्यासाठी प्रयत्न केला आहे जीवन जगत असताना एकमेकांना आधार दिला जातो आहे त्या ऊपकारातून ऊतराई होण्यासाठी वर्षा तून एक दिवस उत्सव पाळला जातो
असाच एक सण म्हणजे बैलपोळा भारत शेती प्रधान देश असल्यामुळे शेतकरी आणि शेती महत्वाचे आहेत यांत्रिकीकरण होण्यापूर्वी शेतीची सर्व कामे बैलांच्या साह्याने केली जात नांगरट वखर पाळी मोट नाडा वाहतूक मालाची निर्यात आदि सर्व कारभार बैलांच्या साह्याने होत असे म्हणून एक दिवस श्रमपरिहार म्हणून ऊतराई होण्यासाठी बैलपोळ्याचा सण साजरा करताना एक वेगळाच आनंद मिळत असे
सकाळी बैलांना नदीवर वा पाण्याच्या ठिकाणी नेऊन स्वच्छ धुवून दुपारी सजवून सायंकाळी वाजत-गाजत मिरवणूक काढली जात असे ग्रामीण भागात वेशीतून प्रथम गावच्या पाटलांचे बैल शहरात वेशीतून नगरपालिका बैल मानाचा असे नंतर घरी आल्यावर सौभाग्यवती बैलांच्या पूजा करून पुरणपोळी धान्य खाऊ घालीत तेव्हा एखाद्या वेळी ओवाळणयासाठी सोन्याच्या दागिन्यांची माळ घेत कधी ती चूकून बैलांच्या पोटात जात असे आणि मग जेव्हा आठवण येई तेव्हा धावपळ तगमग होत असे जून्या बैलपोळ्याचया अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत आता आज बैलांच्या साह्याने शेती केली जात नाही यांत्रिक पद्धतीने शेती केली जाते आणि माणसांना सणांचा उत्साह राहिला नाही गोडी नाही आवडही नाही सवडहि नाही
पूर्वी सारख अप्रूप वाटत नाही धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात आला दिवस ढकलत नेणे आहे
शेवटी कालाय तस्मै नमः
काळानुसार बदल होत असतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *